“प्रेम द्यायचं असतं, प्रेम घ्यायचं असतं’ म्हणत ‘एकदम कडक’ चित्रपटाचा ट्रेलर घालतोय सर्वत्र धुमाकूळ

“प्रेम द्यायचं असतं, प्रेम घ्यायचं असतं’ म्हणत ‘एकदम कडक’ चित्रपटाचा ट्रेलर घालतोय सर्वत्र धुमाकूळ

‘एकदम कडक’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून सोशल मिडियावर होतेय चर्चा

‘एकदम कडक’ चित्रपटाच्या टिझरने साऱ्या रसिक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं आणि आता चित्रपटाच्या ट्रेलरने चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. “प्रेम द्यायचं असतं, प्रेम घ्यायचं असतं” पासून ‘प्रेम बीम काय नाय बरं का’ या डायलॉग पर्यंत पोहोचण्यासाठी कलाकारांनी घातलेला धुडगूस पाहणं रंजक ठरणार आहे. एकदम कडक म्हणत तरुणाईला भुरळ पाडणाऱ्या लक्षणीय अभिनेत्रींना तरुण कलाकारांचा घोळका तोडीस तोड देतोय हे ट्रेलरमध्ये स्पष्ट दिसतंय. ‘ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत एकदम कडक चित्रपटातून अभिनेते माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, पार्थ भालेराव, तानाजी गलगुंडे, अरबाज, चिन्मय संत तसेच अभिनेत्री रुक्मिणी सुतार, भाग्यश्री मोटे, गायत्री जाधव, प्रांजली कंझारकर, जयश्री सोनुने रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाले आहेत. येत्या 2 डिसेंबरला हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होणार आहे.

‘ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत या चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची दुहेरी धुरा गणेश शिंदे यांनी पेलवली आहे. तर पटकथा आणि संवाद कल्पेश जगताप याचे असून चित्रपटाच्या संगीताची बाजू स्व. नरेंद्र भिडे, पंकज पडघन, उमेश गवळी यांनी दिले आहे. तर गीतकार म्हणून मंगेश कांगणे आणि गणेश शिंदे यांनी बाजू सांभाळली आहे. तर चित्रपटातील इतर गाणी सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, उमेश गवळी, सौरभ साळुंखे, सायली पंकज यांनी सुरबद्ध केली आहेत. हा चित्रपट छायाचित्रकार बाबा लाड यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला असून चित्रपटाच्या संकलनाची बाजू आनंद कामत, संदीप जंगम आणि ओम साई फिल्म स्टुडिओ यांनी उत्तमरित्या पेलवली आहे.

येत्या २ डिसेंबरला ‘एकदम कडक’ चित्रपटातील कलाकार एकदम कडक म्हणत मोठा पडदा कसा गाजवणार हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहात जावंच लागेल.

 

By Sunder M