“शेलार साहेबांनी आश्वासन दिले मेनूअल टंकलेखन कायम सुरू राहणार 100 टक्के यश येणार “

महाराष्ट्र राज्य मेनूअल व संगणक टंकलेखन संघर्ष समिती च्या शिष्टमंडळाने 16 jully रोजी मंत्रालयात जाऊन मा.आमदार मोहन फड मा.आ.पवार व शिक्षण आ. श्रीकांत देशपांडे, आम. सुधीर पारवे यांनी शिक्षणमंत्री मा. आशिष शेलार व मा.विनोद तावडे साहेबांच्या सोबत मेनूअल टंकलेखन कायमस्वरूपी सुरू ठेवण्याकरिता चर्चा केली व या चर्चेत मा. विनोद तावडे व मा. आशिष शेलार साहेबांनी संघर्ष समिती ला आश्वासन दिले की मेनूअल टंकलेखन कायमस्वरूपी सुरू राहण्याकरिता मी पूर्ण प्रयत्न करील व या कोर्स मुळे शासनाला कोणताही नुकसान नसुन ग्रामीण भागातील विद्यार्थी व जनतेला या कोर्स चा फायदाच होईल. त्या बद्दल संघर्ष समिती च्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार. यावेळी संघर्ष समिती चे अध्यक्ष दिनेश हरणे सर,जेष्ठ संस्था चालक श्री दंबल सर, श्री गोपाळ सर, श्री दिगांम्बर जाधव सर, अनिल जोंधळे सर, प्रकाश सावंत सर, डाके सर, देशमुख सर, महिप रेवनवर सर, पोतदार सर, प्रतीक्षा हराम मम्, राजबाला मम्, महाजन सर, दिपक ठाकरे सर, चंदा ठाकरे मम्, जय मोरे सर व इतर संस्था चालक उपस्थित होते

By : V. Narsingh Rao