आकाश शेट्टी चा राडा चित्रपटाच्या टेलर व गाणे लॉंच प्रसंगी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, महेश मांजरेकर, महिमा चौधरी, मिलिंद गुणाजी यांची उपस्थिती

आकाश शेट्टी चा राडा चित्रपटाच्या टेलर व गाणे लॉंच प्रसंगी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, महेश मांजरेकर, महिमा चौधरी, मिलिंद गुणाजी यांची उपस्थिती

निर्माता राम शेट्टी आणि दिग्दर्शक रितेश नरवडे यांचा राडा या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणे लाँच कार्यक्रम बुधवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी वाशी पाम बीच रोड येथील आई लीफ बँक्वेट्स हॉल मध्ये आयोजित करण्यात आला होता. राडा चित्रपटाचे शानदार ट्रेलर आणि गाणे लॉंच झाले. यावेळी प्रमुख पाहुणे सांस्कृतिक मंत्री, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह निर्माता,निर्देशक, कलाकार महेश मांजरेकर. अभिनेत्री महिमा चौधरी, कलाकार मिलिंद गुणाजी, पाटील फिल्म फेम संतोष मिजगर, सुरज फिल्म चे रमेश पारसेवार आदीसह अनेक कलाकार व मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी चित्रपटातील मुख्य कलाकार आकाश शेट्टी यांनी सांगितले की राडा हा माझा पहिला चित्रपट असून या माध्यमातून सिनेसृष्टी मध्ये माझा प्रवेश झाला आहे. राडा संस्कृतीवर आधारित ऍक्शन, मनोरंजन, मधुर संगीत अशा सर्व अंगानी हा चित्रपट एकदम मसाला चित्रपट असून या चित्रपटात माझी मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट साऊथ च्या धर्तीवर तयार झालेला जबरदस्त ऍक्शन चित्रपट असला तरी यात रोमान्स आणि खमंग मसाला असा मिक्चर सिनेमा आहे. यात सर्व कलाकारांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. याप्रसंगी उपस्थित मान्यवर व सर्व कलाकारांनी राडा चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. यावेळी चित्रपटातील कलाकार आकाश शेट्टी,योगिता चव्हाण, शिल्पा ठाकरे, यांनी सिनेप्रेमींना आवाहन केले की हा चित्रपट २३ सप्टेंबर रोजी सर्वत्र रिलीज होत आहे सर्वांनी तो सिनेमागृहात जाऊन पाहिला पाहिजे आणि राडा चित्रपट कसा झालाय याचा अनुभव घेतला पाहिजे।

छायाकार : रमाकांत मुंडे मुंबई

 

 

By Sunder M