झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड २०२३ ! मराठी कलाकारांच्या मांदियाळीत रंगला झी मराठी अवॉर्ड २०२३

झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड २०२३ !
मराठी कलाकारांच्या मांदियाळीत रंगला झी मराठी अवॉर्ड २०२३

झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अवॉर्ड. दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगतो.

ह्या दिमाखदार सोहळ्यात प्रेक्षकांना ‘अप्पी आमची कलेक्टर’, ‘तू चाल पुढं’, ‘सारं काही तिच्यासाठी’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’, ‘नवा गडी नवं राज्य’, ‘३६ गुणी जोडी’ ह्या मालिकांमध्ये चुरस रंगलेली बघायला मिळेल. मराठी व हिंदी सिने इंडस्ट्रीमधील तारकांची उपस्थिती लक्षवेधी असणार आहे आणि त्यांचे जबरदस्त रंगतदार परफॉर्मन्स प्रेक्षकांना खिळून ठेवणार आहेत.

सर्व जय्यत तयारी झाली आहे, घरचं कार्य आहे सहकुटुंब सर्वाना आग्रहाचं निमंत्रण, ‘झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड २०२३’, शनिवार ४ नोव्हेंबर, संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

 

 

By Sunder M