‘लेडी डॉन आणि पापा की परीचं’ गावरान धुमशान ‘जाऊ बाई गावात’ ह्या नव्या कार्यक्रमात ! करणार तेव्हा कळणार !

‘लेडी डॉन आणि पापा की परीचं’ गावरान धुमशान ‘जाऊ बाई गावात’ ह्या नव्या कार्यक्रमात !
करणार तेव्हा कळणार !

झी मराठीवर काही दिवसांपूर्वी एक टिझर रिलीझ झाला होता, ‘करणार तेव्हा कळणार, आता मज्जा येणार’ आणि चर्चा सुरु झाली हा कार्यक्रम नक्की आहे तरी काय. ‘जाऊ बाई गावात’ ह्या नव्या रिऍलिटी शोचा आज एक नवीन प्रोमो प्रदर्शित झालाय ज्यात *‘हार्दिक जोशीने’ दोन दमदार स्पर्धकांशी ओळख करून दिली आहे. एक आहे पापा की परी ‘संस्कृती साळुंखे’ जिचा चॉईसच आहे महाग, क्लिनिकल सायकॉलॉजिच्या डिग्रीचा तिला आहे अभिमान, तिच्या समोर कोणी काहीही लपवू शकत नाही.
तर दुसरी स्पर्धक आहे, *श्रीमंत घरची नात जिला घाबरतात सर्व घरात अशी ‘स्नेहा भोसले’ जी आहे लेडी डॉन, तिच्या किक बॉक्सिंगचा आहे सगळीकडे बोलबाला. ऐशोआरामात वाढलेल्या या शहरी मुली गावरान आयुष्य जगू शकणार का? जेव्हा ‘करणार तेव्हा, कळणार’.* ही तर फक्त सुरुवात आहे, हळू हळू उलगडतील तुमच्या समोर एका पेक्षा एक व्यक्तिमत्वाचे स्पर्धक. एक अफलातून संकल्पना जिचा प्रेक्षकांनी विचार सुद्धा केला नसेल.

प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आणि मनोरंजनाची रंगतदार आतिषबाजी करणारा नवीन रिऍलिटी शो ‘जाऊ बाई गावात’ आपल्या भेटीस येत आहे २७ नोव्हेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता फक्त मराठीवर.

 

 

 

By Sunder M