मराठी चित्रपटसृष्टीतील भव्यता अनुभवून करा रविवार खास; ‘आर.आर. काबेल फिल्मफेअर अवॉर्ड’ पाहा कलर्स मराठीवर
मराठी चित्रपटसृष्टीतील भव्यता अनुभवून करा रविवार खास; ‘आर.आर. काबेल फिल्मफेअर अवॉर्ड’ पाहा कलर्स मराठीवर
बहुप्रतिक्षित आर.आर. काबेल फिल्मफेअर मराठी अवॉर्ड्स २०२४ नुकताच मुंबईत पार पडला. या सोहळ्यात विनोद, ग्लॅमर आणि खूप साऱ्या टॅलेंटचे सेलिब्रेशन करण्यात आले.
हा अविस्मरणीय सोहळा पाहाण्यासाठी नवाजुद्दीन सिद्दीकी, महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, जितेंद्र जोशी, तेजस्वी प्रकाश अशा मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट कलाकार, चित्रपट निर्माते, कथाकार आणि तंत्रज्ञ यांचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला.
या सोहळ्याचे सूत्रसंचालन अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या दमदार जोडीने केले. यावेळी प्राजक्ता माळी, प्रार्थना बेहेरे, श्रुती मराठे आणि वैभव तत्त्ववादी त्यांच्या जबरदस्त परफॉर्मन्सने या कार्यक्रमाला चारचांद लावले. तर रिंकू राजगुरू, दीपाली सय्यद, प्रियदर्शनी इंदलकर, स्मिता तांबे , सायली संजीव , गौरी नलावडे आणि अभिज्ञा भावे यांनी सध्या ट्रेंडिंगमध्ये असणाऱ्या ‘गुलाबी साडी’ या गाण्यावर ठेका धरला.
सिनेमॅटिक तेजाचा हा सोहळा तुम्ही ही आता घर बसल्या पाहू शकता. मराठी चित्रपटसृष्टीतील ही भव्यता अनुभवून करा आपला रविवार खास. ५ मे रोजी संध्याकाळी ७ वाजता पाहायला विसरू नका. ‘आर.आर काबेल फिल्मफेअर’ मराठी अवॉर्ड २०२४. फक्त आपल्या कलर्स मराठीवर आणि कधीही पाहा जिओ सिनेमावर !