EntertainmentMarathi

गावरान गोडवा, लेखकाच्या आयुष्याची अनसुनी कहाणी झळकणार रुपेरी पडद्यावर, ‘पायवाटाची सावली’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

गावरान गोडवा, लेखकाच्या आयुष्याची अनसुनी कहाणी झळकणार रुपेरी पडद्यावर, ‘पायवाटाची सावली’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध संगीतकार अमित बिस्वास यांनी लावली हजेरी

लेखकाचा खडतर प्रवास पायवाटाची सावली या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच मान्यवरांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मुंबईत संपन्न झाला. या चित्रपटाचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक मुन्नावर शमिम भगत, बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध संगीतकार अनिल बिस्वास यांचे सुपुत्र अमित अनिल बिस्वास, मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक शिरीष राणे, या चित्रपटाचे वितरक अकात डिस्ट्रीब्यूशनचे संस्थापक चंद्रकांत विसपुते हे उपस्थित होते. हा चित्रपट १३ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल.

YouTube player

लेखकाच्या खऱ्या आयुष्यातील खडतर प्रवास या चित्रकथेतून मोठ्या पडदयावर येणार आहे. जीवनातील कठीण परिस्थितीशी त्याने दिलेली झुंज या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये पाहायला मिळत आहे. तसेच यात एका सुंदर गावातील जीवनशैली आणि साध राहणीमान ट्रेलर मध्ये दिसून येत आहे.

‘मीना शमीम फिल्म्स’ प्रस्तुत ‘पायवाटाची सावली’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची व लिखाणाची धुरा मुन्नावर शमीम भगत यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू ‘मीना शमीम फिल्म्स’ने सांभाळली आहे. तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत अमित अनिल बिस्वास यांनी केले आहे. या चित्रपटात विजे भाटिया, शाल्वी शाह, रेवती अय्यर, प्रसाद माळी आणि शीतल भोसले हे कलाकार आहेत.

या चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक – लेखक मुन्नावर शमीम भगत यांनी त्यांचा अनुभव शेअर करत अस म्हटलं की, “एका गावात अनेक वर्ष पाऊस पडलेला नसतो. तेथील लोक पाण्यविणा आपला उदरनिर्वाह कसा करतात. त्यांची पाण्यप्रतीची तळमळ या चित्रपटात रेखाटली आहे. आयुष्यात हरलेला व स्वतःला निराशेच्या डोहात बुडवलेल्या एका लेखकाची दुर्दशा यात मांडली आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाचा ट्रेलर नक्की आवडेल अशी मी आशा करतो. तसेच काहींना अस वाटेल की हे माझ्यासोबत देखील घडल आहे. काहीना आपल्या खऱ्या आयुष्याच्या वास्तवाची देखील प्रचिती होईल. सर्वांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन एकदा तरी नक्की पहावा अशी मी आशा करतो.”

बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध संगीतकार अनिल बिस्वास यांचे सुपुत्र अमित अनिल बिस्वास यांचे या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण झाले त्याविषयी ते सांगतात.”माझे मित्र मुन्नावर शमीम भगत यांनी माझ्यावर या चित्रपटाच्या संगीत व पार्श्वसंगीताची जबाबदारी दिली. तेव्हा मला फार आनंद झाला. कारण माझे वडील अनील बिस्वास यांनी हिंदी संगीतसृष्टीत खूप उत्तम काम केलं आणि मी आता त्यांच्या संगीताचा वारसा पुढे नेत आहे यात मला आनंद आहे. या चित्रपटातील गाणी सुंदर झाली आहेत. तुम्ही सर्वांनी हा चित्रपट १३ सप्टेंबरला चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा.”

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *