“धर्मवीर २” ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी
“धर्मवीर २” ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला “धर्मवीर २” हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून पहिल्या दिवशी या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत तब्बल १ कोटी ९२ लाखांचा गल्ला कमावला असून २०२४ या वर्षात पहिल्या दिवशी सगळ्यात जास्त कमाई करणारा मराठी सिनेमा ठरला आहे. १५०० पेक्षा ही अधिक शोजने या चित्रपटाची सुरुवात करण्यात आली आहे.
चित्रपटाचा टीजर, ट्रेलरला मिळालेला तुफान प्रतिसाद श्रवणीय संगीत यामुळे तर चित्रपटाची चांगलीच हवा निर्माण झाली होती. रसिकांच्या मानत चित्रपटात नक्की काय दाखवणार याची उत्सुकता होती आणि त्याचेच प्रतिबिंब आपल्याला बॉक्स ऑफिसवर दिसून येत आहे. महिला वर्गाचा वाढता प्रतिसाद मिळत असून कुटुंबासोबत चित्रपट पाहण्यासाठी जात असल्याचे चित्र दिसते आहे. केवळ मुंबई, ठाणे नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये कलेक्शन मध्ये नक्कीच वाढ होईल यात शंका नाही.
धर्मवीर २ या चित्रपटाची अजुन एक विशेष बाब म्हणजे, शिंदे साहेबांची अगदी हूबे हुब भूमिका अभिनेता क्षितीश दाते याने साकारली असून सिनेमाच्या शेवटच्या उत्कंठावर्धक काही मिनिटांमध्ये खऱ्या मुख्यमंत्र्यांच्या अभिनयाची झलक रसिकांना पहायला मिळत असून पडद्यावर मुख्यमंत्री साहेबांची एंट्री होताच रसिकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे. केवळ वन टेक मध्ये साहेबांनी तो सीन झाला असल्याचे निर्माते मंगेश देसाई यांनी आवर्जून नमूद केले.
By Sunder M