EntertainmentMarathi

‘सॅटरडे नाईट’च्या चित्रीकरणाचा शुभारंभ अध्यांश मोशन पिक्चर्स घेऊन येत आहेत थरारक चित्रपट

‘सॅटरडे नाईट’च्या चित्रीकरणाचा शुभारंभ
अध्यांश मोशन पिक्चर्स घेऊन येत आहेत थरारक चित्रपट

अध्यांश मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘सॅटरडे नाईट’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच संपन्न झाला. विलास वाघमोडे आणि अनुप्रिता कडू – गंगावणे दिग्दर्शित या चित्रपटाचे प्रणाली उन्मेश वाघमोडे आणि उन्मेश विलास वाघमोडे निर्माते आहेत. या थरारक चित्रपटात शशांक शेंडे, अक्षया गुरव, पुष्कराज चिरपुटकर, आस्ताद काळे, वर्षा दांदळे, कृतिका तुळसकर, सानिका बनारसवाले आणि जितेंद्र पोळ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. डॉ. सुधीर निकम यांची कथा आणि पटकथा असलेल्या या चित्रपटाचे संवाद विलास वाघमोडे आणि डॉ सुधीर निकम ह्यांचे असून रविंद्र सिद्धू गावडे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत. तर धनाजी यमकर क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आहेत. छायाचित्रणाची धुरा निशांत भागवत याने सांभाळली असून लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर होणार आहे.

‘सॅटरडे नाईट’ हा स्त्री भ्रूण हत्येवर आधारित थ्रिलर चित्रपट असून प्रेक्षकांना एक वेगळा थरार यानिमित्ताने अनुभवायला मिळणार आहे.

‘सॅटरडे नाईट’ विषयी बोलताना दिग्दर्शक विलास वाघमोडे म्हणतात, “हा चित्रपट फक्त गुन्हेगारी तपासावर आधारित नाही, तर मानवी स्वभावाच्या गूढ कोपऱ्यांवर प्रकाश टाकतो. स्त्री भ्रूण हत्येवर भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देईल. ही कथा जरी काल्पनिक असली तरी त्यात वास्तवाचा अंश आहे, जो प्रेक्षकांना त्यांच्याशी जोडेल.”

अनुप्रिता कडू गंगावणे म्हणतात, “सस्पेन्स आणि थ्रिलर हा असा जॉनर आहे, जो प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही मराठी सिनेमाला एका वेगळया उंचीवर नेण्याचा प्रयत्न करत आहोत. ”

 

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *