नोव्हेक्स म्युझिक ची परवानगी न घेता हिंदी बॉलीवूड गाणी वाजविल्याने पोलिसांनी केला गुन्हा दाखल…….
नोव्हेक्स म्युझिक परवाना न घेता हिंदी बॉलीवूड गाणी वाजविल्याने लोणावळा पोलिसांनी ३ रिसॉर्ट्सवर धडक कारवाई करून कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हा दाखल…….
नोव्हेक्स कम्युनिकेशन प्रा. लि. या म्युझिक कंपनीने फिल्म इंडस्ट्रीतील टिप्स कंपनी, झी म्युझिक (झी टीव्ही), यशराज फिल्म्स, दिलेर मेहंदी रेकॉर्ड्स, थिंक म्युझिक व इतर म्युझिक कंपन्यांकडून त्यांच्याच गाण्यांचे स्वामित्व हक्क (अधिकार) घेतलेले असून, हॉटेल्स, बार, रिसॉर्ट्स व सर्व सार्वजनिक ठिकाणी वाजवल्या जाणाऱ्या हिंदी बॉलीवूड गाण्यांसाठी पब्लिक परफॉर्मन्स लायसन्स कंपनीकडून घेणे आवश्यक आहे.
पुण्यातील लोणावळ्यात 1) लगुना रिसॉर्ट, 2) अपर डेक, 3) अरोन रिसॉर्ट या तीन रिसॉर्ट्सनी परवाना न घेता बॉलीवूड हिंदी गाणी वाजवली, म्हणून लोणावळा पोलिसांनी दिनांक 20-12-2024 रोजी गु. र. क्र. 519/24 कलम 51, 63 कॉपीराईट कायद्यान्वये तीनही रिसॉर्ट्सच्या मालक/संचालकांवर गुन्हा दाखल केलेला आहे.
आगामी येणाऱ्या नववर्षाच्या पूर्वसंध्येला खबरदारी म्हणून नोव्हेक्स कंपनीचे छाननी अधिकारी हॉटेल्स, पब्स व सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी फिरून, विनापरवाना हिंदी गाणी वाजवली जात आहेत की नाही याची बारकाईने तपासणी करणार आहेत. तसेच महाराष्ट्र पोलीस दल हे देखील कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन होणार नाही यासाठी त्यांच्या हद्दीतील आस्थापनांवर लक्ष केंद्रित करून कार्यरत आहेत.
लोणावल्यातील ३ रिसॉर्ट्सवर कायदेशीर कार्यवाहीसाठी श्री सुनील फुलारी, मा. विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिषेत्र, श्री पंकज देशमुख – पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शन व देखरेख खाली लोणावला पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व त्यांच्या स्टाफ यांही कॉपीराइट कायद्यांवय़े होणाऱ्या उल्लंघनाची गंभीरतेने दाखल घेऊन तत्परतेने पुढाकार घेतल्यामुळे गुन्हा दाखल होण्यास खूप मदत झाली आहे.
दाखल गुन्ह्याचा बारकाईने तपास करून रिसॉर्ट्स मालक / संचालकाविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची कंपनीला खात्री आहे.
तरी हॉटेल्स/पब्स व सर्व सार्वजनिक ठिकाणी भविष्यात / नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या कार्यक्रमासाठी नोवेक्स म्युझिक कंपनीकडून लायसन्स न घेता, बॉलिवूड हिंदी गाणी वाजवतील त्यांच्यावर कडक कार्यवाही होणार आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावे
(छाया रमाकांत मुंडे )