EntertainmentMarathi

अमृताचा ” एकम ” मधला खास गृहप्रवेश !

नव्या वर्षात अमृताने केला नव्या घरात गृहप्रवेश !

अमृताचा ” एकम ” मधला खास गृहप्रवेश !

अमृता खानविलकर कायम कायम सोशल मीडिया वरून तिच्या कामाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्यातले खास क्षण चाहत्यांसोबत शेयर करताना दिसते आणि अशातच तिने सोशल मीडिया वर नवीन वर्षात तिच्या नवीन घरी गृहप्रवेश केल्याचा खास व्हिडिओ पोस्ट केला आहे. काही दिवसांपूर्वी तिने नवीन घर घेतल्याची बातमी प्रेक्षकांना दिली होती आणि आता तिने नव्या घरात गृहप्रवेश केला आहे.

तिने आजवर अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आज प्रदर्शित झालेल्या संगीत मानापमान चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका देखील तिने साकारली आहे. 2025 वर्षाची उत्तम सुरुवात तिने केली असून वर्षभरात ती अनेक कलाकृती मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.

अमृताने सोशल मीडिया वर व्हिडिओ पोस्ट करत लिहिलं “नव्या वर्षाची नवी सुरुवात गृहप्रवेश केला आणि नव्या घराचा उंबरठा ओलांडला. स्वतःच्या हिमतीवर उभारलेल हे ” एकम”

https://www.instagram.com/reel/DEpCwkMtSC1/?igsh=MWdibjZvemplNW5zMQ==

अमृताने मुंबईत हे नवकोर घर घेतलं असून 22 व्या मजल्यावर 2 बीएचके असलेलं हे घर अमृतासाठी नक्कीच खास आहे !

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *