जिलबी प्रदर्शित होण्याआधीच स्वप्नीलच्या कामाचं कौतुक !
जिलबी प्रदर्शित होण्याआधीच स्वप्नीलच्या कामाचं कौतुक !
२०२५ वर्षाची सुरुवात दमदार सुरू करताना सुपरस्टार अभिनेता आणि निर्माता स्वप्नील जोशी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. येत्या १७ जानेवारीला स्वप्नीलचा बहुचर्चित जिलबी सिनेमा प्रदर्शित होणार आहे पण सिनेविश्वात हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच स्वप्नीलच्या अभिनयाचं कौतुक होताना दिसतंय. काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आणि जिलबी मधला स्वप्नील हा खरोखर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतोय.
जिलबी मध्ये स्वप्नील एका डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतोय पण स्वप्नीलने या आधी कधी ही न साकारलेली भूमिका या निमत्ताने अनुभवयाला मिळणार आहे. करारी लूक आणि स्वप्नीलच्या चित्रपटातील डायलॉग ने आधीच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सस्पेन्स थ्रिलर असलेला जिलबी गोड की गूढ आता हे चित्रपटगृहात जाऊन समजेल.
स्वप्नील हा प्रत्येक भूमिका वेगळ्या धाटणीच्या करतो आणि त्या उत्तम होण्यासाठी तेवढीच मेहनत देखील घेतो. जिलबी मधला त्याचा लक्षवेधी लूक हा आधीपासून चर्चेत असताना आता चित्रपटात स्वप्नील किती धुमाकूळ घालणार यात शंका नाही.
By Sunder M