जिलबी नंतर स्वप्नील घेऊन आला हास्याची अनोखी जत्रा “चिकी चिकी बुबूम बुम” चित्रपटाचा टीझर मधून स्वप्नील साकारणार विनोदवीर भूमिका !
जिलबी नंतर स्वप्नील घेऊन आला हास्याची अनोखी जत्रा “चिकी चिकी बुबूम बुम” चित्रपटाचा टीझर मधून स्वप्नील साकारणार विनोदवीर भूमिका !
सातत्यपूर्ण कामासोबत वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारा स्वप्नील जोशी !
नवीन वर्षाची सुरुवात स्वप्नील ने गूढ आणि गोड जिलबी सोबत केली आणि आता तो पुन्हा एकदा प्रेक्षकांचं हसवून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. स्वप्नील ने नव्या वर्षात चिकी चिकी बुबूम बुम चित्रपटाची घोषणा केल्या नंतर आता तो या चित्रपटात एक विनोदवीर पात्र साकारणार असल्याचं कळतंय. चिकी चिकी बुबूम बुम चित्रपटाचा टीझर मध्ये स्वप्नील वैभवची भूमिका साकारणार असून हे पात्र आता चित्रपटगृहात काय धिंगाणा घालणार हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.
स्वप्नील कायम वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट करताना दिसतो आणि अश्यातच चित्रपटाच्या कथे सोबत तो कायम वैविध्यपूर्ण भूमिका तेवढ्याच ताकदीने साकारून त्यांना योग्य तो न्याय देतो. भूमिका कुठली ही असो स्वप्नील ती भूमिका करण्याचं आव्हानं पेलून तिला किती उत्तम बनवता यईल याकडे लक्ष देऊन काम करतो.
जिलबी मधला रांगडा करारी लूक असलेला पोलीस अधिकारी ते चिकी चिकी बुबूम बुम मधला सगळ्यांचा खदखदून हसून मनोरंजन करणारा स्वप्नील ! वेगळ्या धाटणीच्या भूमिका करणारा स्वप्नील हा कोणत्याही भूमिकेत तितकाच लक्षवेधी ठरतो यात शंका नाही.
जिलबी,चिकी चिकी बुबूम बुम नंतर स्वप्नील सुशीला – सुजीत, शुभचिंतक या चित्रपटात देखील काहीतरी खास घेऊन येणार आहे आणि याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
By Sunder M