EntertainmentMarathi

प्रेमात हरला नाही, प्रतिशोधाने थांबला नाही – तोच आहे ‘गौरीशंकर” २८ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित

प्रेमात हरला नाही, प्रतिशोधाने थांबला नाही – तोच आहे ‘गौरीशंकर”

२८ फेब्रुवारी रोजी चित्रपट सर्वत्र प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत आशयसंपन्न उत्तमोत्तम चित्रपटांच्या तुलनेत धडाकेबाज अॅक्शनपट कमीच होतात. आता ही उणीव गौरीशंकर हा चित्रपट भरून काढणार आहे. या चित्रपटाचा धडाकेबाज टीजर लाँच करण्यात आला असून, २८ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

मुव्हीरूट प्रॉडक्सन्सची निर्मिती असलेल्या गौरीशंकर या चित्रपटाची निर्मिती विशाल प्रदीप संपत यांनी केली आहे. ऑरेंज प्रॉडक्शन्स चित्रपटाचे सहनिर्माता आहेत. हरेकृष्ण गौडा यांची संकल्पना आणि दिग्दर्शन आहे. चित्रपटात हरेकृष्ण गौडा, कविता वसानी दक्षिणा राठोड, राहुल जगताप, सुशील भोसले, संकेत कोळंबकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रशांत आणि निशांत यांनी संगीत दिग्दर्शन, रोशन खडगी यांनी छायांकन, संकेत कोळंबकर यांनी गीतलेखन, अमित जावळकर यांनी संकलन, राशिद मेहता यांनी अॅक्शन, अमित चिंचघरकर यांनी कला दिग्दर्शन, मेकअप नितिन दांडेकर, धनश्री साळेकर यांनी वेशभूषेची जबाबदारी निभावली असून कार्यकारी निर्माता म्हणून सिद्धेश आयरे यांनी काम पाहिले आहे.

‘प्रेमात हरला नाही, प्रतिशोधाने थांबला नाही – तोच आहे ‘गौरीशंकर” अशी गौरीशंकर या चित्रपटाची टॅगलाईन आहे. टीजरमध्ये हाणामारी करणारा, टेन्शन घेने का नाही, देने का असं म्हणणारा रांगडा तरूण दिसतो. मात्र हा तरूण असा का आहे, त्याची काय गोष्ट आहे याची उत्सुकता या टीजरने निर्माण केली आहे. त्याबरोबरच अॅक्शनपॅक्ड मनोरंजनाची हमी हा टीजर देतो. त्यामुळे आता २८ फेब्रुवारी रोजी चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

YouTube player

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *