EntertainmentMarathi

‘रॉटरडॅम’मध्ये गौरवलेल्या ‘फॉलोअर’ चित्रपटाचा टीजर लाँच

‘रॉटरडॅम’मध्ये गौरवलेल्या ‘फॉलोअर’ चित्रपटाचा टीजर लाँच

सीमाभागातील तरुणाच्या वैचारिक संघर्षाची गोष्ट

रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरवलेल्या “फॉलोअर” या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. सीमाभागातील तरुणाच्या वैचारिक संघर्षाची कहाणी या चित्रपटातून उलगडणार असून, मराठी, कन्नडा आणि हिंदी या भाषांचे अनोखे मिश्रण या चित्रपटात आहे.

‘फॉलोअर’ची निर्मिती ऑरेंजपिक्सेल स्टुडिओज आणि व्हिस्का फिल्म्स यांनी हमारा मीडिया लॅब्स आणि कॉजॅलिटी फिल्म्स प्रोडक्शन यांच्या सहकार्याने केली आहे. विनय मिश्रा, प्रीती अली, प्रतीक मोइत्रो, अनुभव केआर, पल्लवी रोहतगी, मौलिक शर्मा, चारुलता मैत्र, हर्षद नलावडे हे या चित्रपटाचे निर्माते असून राघवन भारद्वाज, चरण सुवर्णा आणि अभिषेक गौतम हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन हर्षद नलावडे यांचे असून निभावली असून रघु बसरीमारद, डोना मुन्शी आणि हर्षद नलावडे यांच्यासह प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे. साकेत ग्यानी यांनी छायाचित्रण, मौलिक शर्मा संकलक, सम्यक सिंग यांनी लिहिलेल्या गीतांना सम्यक सिंग आणि अभिज्ञान अरोरा यांचे संगीत लाभले असून ही गाणी सम्यक सिंग यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आली आहेत.


महाराष्ट्राच्या सीमाभागात मराठी, कन्नडा भाषिक वाद आहेत. हा विषय अपवादानंच चित्रपटात हाताळला गेला आहे. चित्रपटाच्या टीजरमधून पत्रकार असलेल्या तरुणाच्या वैचारिक संघर्षाची कथा हाताळण्यात आल्याचं दिसतं. या कथेला नातेसंबंध, राजकारण असे पदर असल्याचंही जाणवतं. चित्रपटाचा टीजर पहिल्या फ्रेमपासूनच गुंतवणारा आहे. चित्रपटातील कलाकार नव्या दमाचे असले, तरी रॉटरडॅमसारख्या प्रतिष्ठित महोत्सवात दाखवल्या गेलेल्या या चित्रपटातून एक अनोखी गोष्ट मांडण्यात आली आहे. त्यामुळेच या चित्रपटाचा टीजर कुतूहल वाढवणारा आहे. आता ‘फॉलोअर’ला चित्रपटगृहात मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी फॉलो करावं लागणार आहे.

YouTube player

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *