‘मी पाठीशी आहे’ सांगणार नव्या युगातील स्वामी समर्थांच्या अस्तित्वाची प्रेरणादायी गाथा
‘मी पाठीशी आहे’ सांगणार नव्या युगातील स्वामी समर्थांच्या अस्तित्वाची प्रेरणादायी गाथा
२८ मार्च रोजी होणार प्रदर्शित
नव्या युगातील स्वामी समर्थांच्या अस्तित्वाची प्रेरणादायी गाथा सांगणारा ‘मी पाठीशी आहे’ हा चित्रपट येत्या २८ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटात श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्माचा अनोखा संगम प्रेक्षकांना अनुभव्हायला मिळणार आहे.
दिग्दर्शक पराग अनिल सावंत म्हणतात,” मी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की, हा चित्रपट कोणीही बनवत नसून हा चित्रपट स्वतःहून घडला आहे. स्वामींनी तो आमच्याकडून घडवून घेतला आहे. आम्ही सगळे निमित्तमात्र आहोत. ‘मी पाठीशी आहे’ हा चित्रपट अनेक श्रद्धावान व्यक्तीच्या आयुष्यातील प्रेरणादायी अनुभवाचा प्रवास आहे. स्वामी समर्थांनी प्रत्येकाला दिलेला आधार, त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती यावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करून नक्कीच सकारात्मक ऊर्जा देईल.आम्हाला खात्री आहे की, हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.”
ऑफबीट प्रॉडक्शन, नित्य सेवा प्रॉडक्शन आणि वेरा प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे कथा, संकलन आणि दिग्दर्शन पराग अनिल सावंत यांनी केले असून मयूर अर्जुन खरात, लक्ष्मीकांत गजानन कांबळे, ॲड. शुभांगी किशोर सोनवले, प्रमोद नंदकुमार मांडरे, शितल सोनावणे, ऋतुजा नरेंद्र कदम, अनिल गावंड आणि केतन कल्याणकर या स्वामींच्या सेवेकरांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. संजय नवगिरे, दिलीप परांजपे यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली असून संजय नवगिरे यांनी चित्रपटाचे संवादही लिहिले आहेत. तर चित्रपटातील गाण्यांना कबीर शाक्य यांना संगीत सेवा करण्याची संधी लाभली आहे. या चित्रपटात सक्षम कुलकर्णी, सतीश पुळेकर, अरुण नलावडे, सुहास परांजपे, वर्षा प्रभु, श्रीकांत पाटील, अश्विनी चवरे, प्रसाद सुर्वे, शितल सोनावणे, सूचित जाधव, श्रद्धा महाजन, राजवीर गायकवाड, वैष्णवी पोटे यांच्या प्रमुख भूमिका असून माधुरी पवार, संदेश जाधव आणि नूतन जयंत हे विशेष पाहुणे म्हणून झळकणार आहेत.
By Sunder M