EntertainmentMarathi

अंकुश चौधरी म्हणतोय ‘थांब म्हटलं की थांबायचं’

अंकुश चौधरी म्हणतोय ‘थांब म्हटलं की थांबायचं’

मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी छाप उमटवणारा, सुपरस्टार अंकुश चौधरी लवकरच एका नव्या दमदार भूमिकेत झळकणार आहे. ‘पी.एस.आय. अर्जुन’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून ९ मे २०२५ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. थांब म्हटलं की थांबायचं अशी चित्रपटाची टॅगलाईन असल्यामुळे यंदाच्या मे महिन्यात तापमान अधिकच गरम होणार आहे. व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित विक्रम शंकर प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शक भूषण पटेल आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत.

YouTube player

मोशन पोस्टरमध्ये अंकुशचा पोलिसांच्या वर्दीतला पी एस आय चा लूक पाहायला मिळत आहे, जो चित्रपटाच्या कथानकाविषयी अधिकच उत्सुकता निर्माण करणारा आहे.

 

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *