EntertainmentMarathi

शशिकांत धोत्रेंचा पहिलाच रोमँटिक सिनेमा ‘सजना’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

आकर्षक आणि धोत्रेंच्या चित्रांसारखंच मोहक आणि मंत्रमुग्ध करणारं पोस्टर आणि टिझर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे!!

चित्रपटसृष्टीने नेहमीच विविध रोमॅंटीक कथांनी प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे विशेषतः तरूण-तरुणींच्या हृदयावर अधिराज्य हे रोमॅंटीक कथांनीच गाजवलं आहे. सिनेसृष्टीच्या इतिहासात असे अनेक चित्रपट आहेत ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कथांसह प्रयोग केले आहेत, परंतू प्रेमकथा नेहमीच चित्रपटांचा आत्मा राहिल्या आहेत.
सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना, संपुर्ण फॅमिलीला आकर्षित करणारा प्रकार म्हणून रोमॅंटीक सिनेमाकडे पाहिलं जातं.

असाच रोमँटिक चित्रपट ‘सजना’ आपल्या भेटीला लवकरच येणार आहे. शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित ‘सजना’ सिनेमा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे.

‘सजना’ सिनेमाच्या पोस्टरवर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दोन प्रेमी आपण पाहू शकतो जे पाण्यात रोमँटिक पोज मधे आहेत.

धोत्रेंच्या चित्रांसारखंच हे पोस्टरसुद्धा एक सुंदर पेंटिंगच आहे. जे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार शशिकांत धोत्रे यांचे जिवलग मित्र प्रमोद कुर्लेकर यांनी तयार केले आहे. ज्यात दोन प्रेमी पाण्यांवर तरंगत आहे, आजूबाजूला असलेल्या संपूर्ण जगाचा जणू त्यांना विसर पडलाय; “सजना” सिनेमाच्या टिझर मध्येही ह्याच जोडप्याला आपण रोमँटिक संवाद साधताना पाहू शकतो.

YouTube player

विशेष म्हणजे टीझर मधील प्रत्येक शॉट लक्षवेधी असून पेंटींग प्रमाणेच बारकाईने चितारलेले वाटतात, तरुण फ्रेश जोडी या सिनेमात मुख्य भूमिकेत असणार आहे त्यांचा चेहरा टिझर मध्ये अद्याप पूर्णपणे उघड केला गेला नाही आहे. टिझर मध्ये सुंदर पेंटीग सारख्या व्हीजुअल्स सोबतच कर्णमधूर असं ओंकारस्वरूपचं संगीत आणि सोनू निगमचा आवाज आहे जे नक्कीच तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित ही प्रेमकथा असून गावातील सुंदर दृश्य आणखी शोभा वाढवते. टिझरच्या शेवटी प्रेमापोटी एकमेकांमध्ये गुंतलेल्या जोडप्याला कोणते परिणाम भोगावे लागतात याबद्दल हि छोटी झलक पहायला मिळते. त्यामुळे नक्की चित्रपटाची कथा काय असणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता आहे. टिझर मध्ये चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. ‘सजना’ सिनेमा २३ मे २०२५ ला चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘सजना’ चित्रपटाची निर्मिती स्वतः शशिकांत धोत्रे ह्यांनी केली आहे तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन सुद्धा शशिकांत धोत्रे ह्यांनी केलं आहे. शशिकांत धोत्रे हे एक संवेदनशील चित्रकार म्हणून लोकप्रिय आहेतच आणि आता ते ‘सजना’ पासुन चित्रपट क्षेत्रात एका संवेदनशील रोमॅंटीक कथेच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. त्यांनी काढलेली चित्रं आज देश-विदेशात लाखोंच्या संख्येनं रसिकांची दाद मिळवतायत, अशाच प्रकारे त्यांचा हा पहिला मराठी सिनेमा सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार आहे.

ॲक्शन चित्रपटांच्या गर्दीत नवोदित प्रेमाच्या कथा पाहणे नेहमीच वेगळा अणि सुखद अनुभव देऊन जातात, त्यामुळे सुमधूर संगीतानी सजलेला रोमॅंटीक ‘सजना’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक होतील आणि हा भव्य दिव्य मराठी चित्रपटाचा अनुभव प्रेक्षकांनी मोठ्या पाड्यावरच आवर्जून घ्यावा

‘सजना’ २३ मे २०२५ ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

 

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *