EntertainmentMarathi

प्रेम, वेदना आणि आशेची अनोखी कहाणी, पद्माराज राजगोपाल नायर दिग्दर्शित “माझी प्रारतना” चित्रपटाचं हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित !

प्रेम, वेदना आणि आशेची अनोखी कहाणी, पद्माराज राजगोपाल नायर दिग्दर्शित “माझी प्रारतना” चित्रपटाचं हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित !

मराठी चित्रपटसृष्टीत एक नवीन आणि हृदयस्पर्शी प्रेमकथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पद्माराज राजगोपाल नायर दिग्दर्शित “माझी प्रारतना” हा सिनेमा सध्या खूप चर्चेत आहे आणि आज या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून रसिक प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्रेम म्हणजे केवळ भावना नाही, तर जगण्याची एक जाणीव आहे आणि ही जाणीव सादर करणारा हा उत्कृष्ट ट्रेलर आहे.

ट्रेलर मध्ये आपण पाहू शकतो कि प्रेम जेव्हा अडचणींवर मात करत टिकतं, तेव्हाच त्याची खरी ताकद समोर येते. अशाच प्रेमाच्या विविध पैलूंना स्पर्श करणारा हा ट्रेलर आहे ज्यात सुदंर चित्रीकरण,उत्कृष्ट अभिनय, मधुर संगीत आणि इमोशन्स आपण पाहू शकतो. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर कथेबाबतची उत्कंठा आणखीनच वाढली आहे. कथेमधील रहस्य आणि कहाणी नक्की कशी असणार आहे हे येत्या ९ मे ला समजेलच.

‘माझी प्रारतना’ हा चित्रपट ब्रिटिश काळातील ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. ही एक संगीतप्रधान कथा असून, प्रेम, विश्वासघात आणि जगण्याच्या जिद्दीचा अद्भुत प्रवास मांडते. चित्रपटात पद्माराज राजगोपाल नायर आणि अनुषा अडेप प्रमुख भूमिकेत आहेत, तसेच मराठीतील अनेक दिग्गज कलाकारही यात सहभागी आहेत.

एस आर एम फिल्म स्कूल प्रस्तुत “माझी प्रारतना” या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन पद्माराज राजगोपाल नायर ह्यांनी केलं आहे, पद्माराज नायर फिल्म्स ह्यांची निर्मिती असून संगीत विश्वजित सी.टी. यांनी दिले आहे. “माझी प्रारतना” हा सिनेमा ९ मे २०२५ पासून जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

YouTube player

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *