स्वप्नांची भाषा, आत्मविश्वासाचा आवाज, मुक्ता आर्टस् निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘अमायरा’ चं शीर्षक गीत प्रदर्शित !!
स्वप्नांची भाषा, आत्मविश्वासाचा आवाज, मुक्ता आर्टस् निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘अमायरा’ चं शीर्षक गीत प्रदर्शित !!
प्रेक्षकांच्या उत्सुकतेला उधाण आणणाऱ्या मुक्ता आर्टस् निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित “अमायरा” या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाचं शीर्षक गीत आज प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे गाणं चित्रपटाच्या प्रेमळ आणि भावनिक कथेची झलक देतं आणि नक्कीच संगीतप्रेमींना एक सुरेल अनुभव देणारं ठरत आहे.
‘अमायरा’ या गाण्यात अजिंक्य देव आणि सई गोडबोले यांची जोडी अनोख्या आणि हलक्या मूडमध्ये दाखवली आहे. अमायरा आपल्या हसऱ्या आणि खेळकर स्वभावाने अजिंक्यला हसवते, तर पूजा सावंतसोबतच्या गोड आणि आनंददायक क्षणांत ती अजूनच चुलबुली दिसते. इतकच नव्हे तर गाण्याच्या सुरुवातीला सई आणि राजेश्वरी सचदेव ह्या दोघांची जोडी एक आई आणि मुलगी म्हणून आपण पाहू शकतो. गाण्यात सई, अजिंक्य देव आणि पूजा ह्या दोघांशी बिनधास्तपणे खेळते, शरारत करते आणि आयुष्यातील छोटे आनंद साजरे करते. प्रत्येक टॅलेंटेड कलाकाराची उर्जा ह्या गाण्यातून, कॅमेरा आणि सुरांच्या माध्यमातून प्रकटते, जे चित्रपटाच्या मूडला सजीव बनवतात.
गीतकार आणि संगीत दिग्दर्शकाच्या अप्रतिम सर्जनशीलतेतून जन्मलेलं हे गाणं, नायिका सई गोडबोले हिच्या भावविश्वात डोकावण्याची संधी देतं. या गीतात प्रेम, आणि आशेचा सुरेख संगम आहे, जो प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करतो.
‘अमायरा’ गाण्याचे संगीत दिग्दर्शक अभिषेक बोंथू आहेत. तर गाण्याचे बोल रोहित राऊत ने लिहिले आहेत. अभिनेत्री सई गोडबोले हिने स्वतः आणि श्याम राऊत ने आपल्या मधुर आवाजाने हे गीत अधिकच प्रभावी केले आहे. गाण्याचं चित्रीकरण देखील अत्यंत नेत्रसुखद असून, अमायरा आणि तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांचं सुंदर चित्रण करण्यात आलं आहे.
मुक्ता आर्टस् निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित, ए व्ही के एंटरटेनमेंट आणि महलसा एंटरटेनमेंट च्या अंतर्गत नवा मराठी चित्रपट “अमायरा” या सिनेमाचे दिग्दर्शक लोकेश गुप्ते हे असून लेखक मिहीर राजदा आहेत. तसेच राहुल पुरी, स्वाती खोपकर, सुरेश गोविंदराय पै निर्माते आहेत. तर सह निर्माते निनाद नंदकुमार बत्तीन आणि तबरेज पटेल आहेत.’अमायरा’ हा चित्रपट १६ मे २०२५ ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.