“दुर्गे दुर्घट भारी” – भक्ती, श्रद्धा आणि उर्जेचा सुरेल गजर आता रसिकांसमोर
‘’पुन्हा शिवाजी राजे भोसले’’ या चित्रपटातील पहिले गीत ‘दुर्गे दुर्घट भारी’ नुकतेच प्रदर्शित झाले असून हे गीत रसिकांच्या मनात भक्तीचा, नवचैतन्याचा संचार करत आहे. पारंपरिक स्तोत्राला आधुनिक संगीताची नवी छटा देत हे गीत महाराष्ट्रभर गुंजत आहे.
या गीतातून दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी पहिल्यांदाच संगीतकार म्हणून पदार्पण केले आहे. श्रद्धा आणि संगीतरसाचा सुंदर संगम साधत त्यांनी या आराधनागीताला वेगळाच आविष्कार दिला आहे.

या गीताला शंकर महादेवन यांच्या प्रभावी आणि दैवी आवाजाची साथ लाभली असून ढोल-ताशांचा दणदणाट (वरद कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, रुंल सावंत) देवीच्या जयघोषाची अनुभूती देतो. आयडी राव यांच्या हॉर्न्सनी गाण्याला भव्यता दिली आहे.
याशिवाय यशराज स्टुडिओमधील विजय दयाल यांनी केलेल्या मिक्सिंग आणि मास्टरिंगमुळे गीत अधिक प्रभावी बनलं आहे.
‘दुर्गे दुर्घट भारी’ हे केवळ गाणं नसून देवीच्या आराधनेतून निर्माण होणारा भक्तिरसाचा झरा आहे. सध्या हे गीत प्रत्येक घराघरात, प्रत्येक मनामनात भक्तीचा आणि उर्जेचा जयघोष घुमवत आहे.
By Sunder M