FashionMarathi

‘प्रथा’ – हँडलूम साड्यांचा नवा अध्याय! पुण्यात लोकप्रियता मिळवल्यानंतर आता ठाण्यात भव्य शोरूम

पुण्यातील महिलांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर, सुप्रसिद्ध ब्रायडल हेअर अँड मेकअप एक्स्पर्ट कविता कोपरकर यांचा ‘प्रथा’ हा लोकप्रिय हँडलूम साडी ब्रँड आता ठाण्यातील राम मारुती रोडवरील आपलं नवं आणि भव्य शोरूम घेऊन सज्ज झाला आहे. नुकतेच या भव्य शोरुमचे उदघाटन झाले. भारतीय हातमाग साड्यांच्या सौंदर्याला आधुनिकतेची झळाळी देणाऱ्या या ब्रँडच्या उद्घाटन सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार उपस्थित होते.

या विशेष कार्यक्रमाला श्रेया बुगडे, सोनाली कुलकर्णी, भार्गवी चिरमुले, चैत्राली गुप्ते, सावनी रविंद्र, राधा सागर, राधिका विद्यासागर, सुखदा खांडकेकर, मेघना एरंडे, शिवानी रांगोळे, गिरिजा ओक, क्षिती जोग, धनश्री काडगावकर, अमृता देशमुख, प्राजक्ता हनमघर, स्पृहा जोशी, तसेच लोकप्रिय अभिनेते शशांक केतकर, अभिजित खांडकेकर आणि मंजिरी ओक हे सेलिब्रिटी उपस्थित होते.

२०१६ साली केवळ ३२ सिल्क साड्यांपासून सुरू झालेली ‘प्रथा’ची ही सफर आज हजारो साड्या विकणाऱ्या लोकप्रिय ब्रँडमध्ये रूपांतरित झाली आहे. ब्रायडल इंडस्ट्रीमध्ये ४५०० हून अधिक वधूंना सजवण्याचा अनुभव असलेल्या कविताने साडीप्रेम, रंगसंगतीची जाण आणि पारंपरिक कलाप्रेम यांचा संगम साधून ‘प्रथा’ची स्थापना केली.

पुण्यातील भांडारकर रोडवरील २५०० चौ.फुटांचे आकर्षक स्टोअरनंतर आता ‘प्रथा’चे आता ठाण्यात दोन मजली आणि सुमारे ३००० चौ.फुटांचे भव्य शोरूम आहे. या ठाणे स्टोअरमध्ये भारतातील ४० पेक्षा अधिक विविध वीण व पारंपरिक शैलीतील साड्या पाहायला मिळतील. प्रत्येक साडी स्वतः कविता कोपरकर वैयक्तिकरित्या देशभरातील वीणकरांकडून निवडतात. आजवर रेणुका शहाणे, मृणाल कुलकर्णी, अनुराधा पौडवाल, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, स्पृहा जोशी, पर्ण पेठे, शिवानी सोनार, शिवानी रांगोळे स्वानंदी टिकेकर यांच्यासह अनेक अभिनेत्रींनी या साड्या परिधान केल्या आहेत.

या प्रवासाबद्दल कविता कोपरकर म्हणतात, ‘ ‘प्रथा’ साडीच्या ब्रँडबरोबरच भारतीय परंपरेचं आणि स्त्रीच्या सौंदर्याचं प्रतीक आहे. ठाण्यातील या नव्या प्रवासातून आमचं उद्दिष्ट आणखी मोठं आहे. महाराष्ट्रातील पहिला असा साडी ब्रँड बनवण्याचं, जो देशभर आणि जगभर भारतीय हातमाग साड्यांचं वैभव पोहोचवेल.”

या ब्रँडमध्ये ५० हून अधिक महिला कर्मचारीवर्ग कार्यरत आहे. प्रथाची दोन्ही स्टोअर्स शांत, आल्हाददायक आणि लक्झरियस इंटीरियरसाठी प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे ठाण्यातील स्टोअरमध्ये एक वेगळा रिसेप्शन एरिया तयार करण्यात आला आहे, जो साडी स्टोअरसाठी अत्यंत अनोखा आणि आकर्षक आहे. प्रत्येक साडीप्रेमी स्त्रीला आपल्या बजेटनुसार परिपूर्ण साड्या इथे मिळणार आहेत.

 

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *