कौटुंबिक संबंध आणि दैनंदिन जीवनाच्या पार्श्वभूमीवर प्रेम, विश्वास आणि एकोपा वाढणारी एक कोमल कथा “कडीपत्ता “
युवान प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या कडीपत्ता या चित्रपटात आपल्याला एक लपलेलं सत्य आणि प्रेमाची उत्कंठता पाहायला मिळते. चित्रपटाची निर्मिती स्वप्नील युवराज मराठे यांनी केली आहे चित्रपटाची कथा विश्वा यांनी लिहली असून दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. निर्माते स्वप्नील युवराज मराठे आणि दिग्दर्शक विश्वा यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.
या चित्रपटाची सुरुवात घटस्फोटा साठी अर्ज केलेल्या जोडप्या पासून होते.
ललित देशमुख (भूषण पाटील )आणि मीरा पाटील (रिद्धी कुमार )यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला असतो आणि न्यायाधीश (आनंद इंगळे ) हे दोघांची बाजू ऐकून घेत असतात. दोघांचे वकील चेतना भट आणि आनंद कारेकर दोघांची बाजू मांडताना दिसतात. 
मीरा घटस्फोटच्या बदल्यात घर आणि पन्नास लाखाची मागणी करते. आणि ललित हा विवाह बाह्य संबंधात अडकलेला आहे.हे कोर्टाला सांगते.
ललित हे कोर्टात सर्व मान्य करतो. यावर कोर्ट या जोडप्याना सहा महिन्यासाठी एकत्र राहण्यास आणि समेट घडवण्याचा सल्ला देते. या सहा महिन्यात ललित तिची पूर्ण जबाबदारी व खर्च सांभाळेल व मीरा पत्नी म्हणून सर्व कर्तव्य पार पाडेल असे ठरते.आणि दोघेही ते मान्य करतात.
पुढील सहा महिन्यात मीराने जे ललित वर विवाहबाह्य संबंधाचे आरोप लावले होते ते खरे होते का? मीराने घटस्फोटात जी मागणी केली होती ती ललित पूर्ण करतो का? पुढील सहा महिन्यात मिराला ललितबद्दल खूप सारी माहिती प्राप्त होते. ती काय असते.? हे जाणण्यासाठी आपल्याला हा चित्रपट, चित्रपट गृहात जाऊन पाहावा लागेल.
कडीपत्ता निमित्ताने चित्रपटात एक अनोखी प्रेमकहाणी प्रेशकांना पाहायला मिळणार आहे
कढीपत्ता, , एक रोमँटिक मराठी चित्रपट असून मोहक व आकर्षक भूषण पाटील मुख्य भूमिकेत परिपक्व दिसत आहे तर रिद्धी कुमार हिचा हा पहिलाच मराठी चित्रपट असून ही ती कुठे कमी पडलेली दिसत नाही
या चित्रपटा द्वारे विश्वा दिग्दर्शनात पदार्पण केलेले आहे, ज्यानी कथा, पटकथा आणि संवाद देखील लिहिले आहे. पण चित्रपटात कुठे ही त्यांचा नवखेपणा जाणवला नाही
विश्वाची कथा वाखाणण्या जोगी आहे. त्याची पटकथा उत्साहवर्धक आहे आणि प्रेक्षकांना खरोखरच गुंतवून ठेवते.
चित्रपटात कुठेही कंटाळवाणा सीन नाही. सलग पात्र आपली कामे करताना दिसतात. मध्येच विनोदी दृश्य तर मधेच भावनिक दृश्य. उत्तरार्धात दोन भावनिक दृश्ये आहेत, जी चांगली आहेत. क्षणातच चित्रपट हसवतो तर क्षणात रडवतो.
ललित म्हणून भूषण पाटील याची भूमिका उत्तम आहे तर. रिद्धी कुमार त्याच्या तोडीची दिसते. अक्षय टंकसाळेने ललितचा मित्राची उत्तम भूमिका पार पाडली आहे, संजय मोने आणि शुभांगी गोखले हे ललितचे आई वडील शोभून दिसतात त्यात . गार्गी फुले, मीराची आई म्हणून भाव खाऊन जाते.
आनंद कारेकर (मीराचे वकील म्हणून), चेतना भट (ललितचे वकील म्हणून), आनंद इंगळे (न्यायाधीश म्हणून), गौरी सुखटणकर (डॉ. विद्या म्हणून), सानिका काशीकर (मीराची मैत्रिण, सारिका म्हणून), निशा माने (रितेशची मैत्रीण/पत्नी म्हणून) यांच्या साजेशा भूमिका आहेत.
पद्मनाभ गायकवाड आणि आशिष खंडाळ यांचे उत्तम संगीत आहे. ज्या मध्ये सांगावे.. हे गीत स्मरणात राहणारे आहे. . तन्मय भिडेचे पार्श्वसंगीत उल्लेख करण्यासारखे आहे. अनिकेत खंडागळेचे सिनेमॅटोग्राफी ठीक आहे. कमलेश छबुराव मोकल यांचे कलादिग्दर्श छान आहे.म्हणून एकूणच हटके चित्रपट म्हणून कडीपत्त्याची गणना करण्यास हरकत नाही.
By Sunder M
