EntertainmentMarathi

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता श्रमेश बेटकर अभिनेत्री जुईली टेमकर यांची मध्यवर्ती भूमिका २१ नोव्हेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या जोरदार चर्चेत असलेल्या ‘लास्ट स्टॉप खांदा…’ या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे. उत्तम लेखन, अभिनय, संगीत असलेला, पुरेपूर मनोरंजन करणारा हा चित्रपट २१ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून, चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.

शिवम फिल्म क्रिएशन सिग्नेचर ट्यून्स, स्नेहा प्रॉडक्शन्स यांनी “लास्ट स्टॉप खांदा… ” प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन कदम आणि सचिन जाधव यांनी या चित्रपटाती प्रस्तुती केली आहे. प्रदीप मनोहर जाधव हे या चित्रपटाचे निर्माते असून सचिन कदम, अमृता सचिन जाधव सहनिर्माते आहेत. श्रमेश बेटकर लिखित या चित्रपटाचं दिग्दर्शन विनित परुळेकरनी केलं आहे. चित्रपटात अभिनेता श्रमेश बेटकर अभिनेत्री जुईली टेमकर, निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश कापरेकर, प्रियांका हांडे, डॉ. सचिन वामनराव, गणेश गुरव, निशांत जाधव, गिरीश तेंडुलकर, जयश्री गोविंद अशी तगडी स्टारकास्ट आहे. तर पाहुणे कलाकार म्हणून प्रभाकर मोरे, धनश्री काडगावकर, अशोक ढगे हे आपल्या भेटीस येणार आहेत. चित्रपटाचं छायांकन हरेश सावंत यांचं असून कलादिग्दर्शक केशव ठाकुर आहेत. संगीत श्रेयस राज आंगणे यांचे आहे, तर नृत्यदिग्दर्शन राहुल बनसोडे, रवी आखाडे यांचे आहे.

प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट ‘लास्ट स्टॉप खांदा’ या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. नावापासूनच चर्चेत असलेल्या या चित्रपटातलं ‘शालू झोका दे गो मैना’सह टायटल साँग, टीजरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. एका तरुणाचं त्याच्या लहानपणापासून एका मुलीवर प्रेम असतं, पण ते प्रेम यशस्वी झालेलं नसतं. मात्र, त्या मुलीचं तिच्या प्रियकराशी ब्रेकअप होताच, हा तरुण पुन्हा एकदा तिच्या अनेक वर्षांनी आयुष्यात आपलं स्थान शोधण्याचा प्रयत्न करतो. या प्रयत्नात तो यशस्वी होतो की नाही याची मनोरंजक गोष्ट “लास्ट स्टॉप खांदा” या चित्रपटात पहायला मिळणार आहे. अनेक चढउतार असलेल्या या कथानकातून प्रेम या संकल्पनेचा हलक्याफुलक्या पद्धतीनं शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधून हलकीफुलकी कथा, खुसखुशीत संवादाची फोडणी असल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे आता या चित्रपटाविषयीची उत्कंठा निर्माण झाली आहे. हा चित्रपट २१ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात पाहता येणार आहे.

YouTube player

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *