EntertainmentMarathi

वैशाली काळे, सागर सकट, नितीन घुगे निर्मित, अभिनेता अजिंक्य राऊतचं “तुला ना कळे” हे प्रेम गीत प्रदर्शित, सोशल मीडियावर गाण्याची चर्चा

अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींना समर्पित ‘तुला ना कळे’ गाणं प्रदर्शित

अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघात हा भारताच्या हवाई अपघाताच्या इतिहासातील सर्वात भीषण अपघात होता. या अपघातात अनेकांनी कुटुंबातील आपल्या जवळची माणसं गमावली. अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींना समर्पित ‘तुला ना कळे’ गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. या रोमँटिक आणि भावनिक गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळतं आहे. सुप्रसिद्ध अभिनेता अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री श्रेया जाधव यांनी या गाण्यात प्रमुख भुमिका साकारली आहे. प्रसिद्ध गायक हर्षवर्धन वावरे आणि गायिका शुद्धी कदम यांनी सुमधुर आवाजात हे गाणं गायलं आहे. तर गाण्याची गीतरचना आणि संगीत दिग्दर्शन अभिनंदन गायकवाड यांनी केले आहे. या गाण्याचे संगीत नियोजन मिलिंद मोरे यांनी केले आहे.

YouTube player

या गाण्याचे दिग्दर्शक सागर साकत हे आहेत. या गाण्याची निर्मिती वैशाली काळे, सागर सकट आणि नितीन घुगे यांनी केली आहे. तर या गाण्यात प्रज्ञा कदम, प्रथमेश कदम, वैशाली जाधव, आशुतोष कांबळे, किरण राऊत, केतन रणखांबे, प्राजक्ता मोहिते आणि विजय सोनगिरे हे कलाकार देखील आहेत. हे गाणं मुंबईत चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्याचा संगीत अनावरण सोहळा नुकताच मुंबईत पार पडला.

या गाण्याचे संगीत दिग्दर्शक अभिनंदन गायकवाड (A.V.G.)या गाण्याच्या प्रोसेसविषयी म्हणाले, “मी आणि माझा मित्र निर्माता सागर सकट आम्ही विक्रोळीवरून ठाण्याला प्रवास करत होतो आणि त्या प्रवासादरम्यान त्याने मला एक कथा ऐकवली त्यावरून मला या गाण्याचं शीर्षक सुचलं. बोलता बोलता मुखडा ही सूचत गेला. आणि अस हे गाण तयार झालं. हे गाणं मुंबईच्या मरीन लाईन्स, गिरगाव, फोर्ट, ठाणे अश्या प्रेक्षणीय स्थळांवर चित्रीत झालं आहे. तुम्ही नक्की हे गाण ऐका आणि आम्हाला कमेंट्स करून गाण कस वाटल ते कळवा.”

“तुला ना कळे” गाण्याची निर्माती वैशाली काळे गाण्याच्या संकल्पनेविषयी सांगते, “’तुला ना कळे’ या गाण्याचा प्रवास सुंदर आणि सुखद आहे. एक अधुरी प्रेमकथा आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेत एक एयर हॉस्टेसच अपघाती निधन झाल तिची कहाणी आपण यात मांडली आहे. एस एन वी स्टुडिओ या संगीत रेकॉर्ड लेबलचं हे पहिलच गाण आहे. मी, सागर साकत आणि नितीन घुगे या निर्मात्यांनी एकत्र येऊन हे प्रोडक्शन हाऊस सुरू केल आहे. येणाऱ्या नवीन वर्षात आमचे अनेक प्रोजेक्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हा रसिक प्रेक्षकांचं प्रेम कायम असंच राहू द्या.”

या गाण्याचे दिग्दर्शक – निर्माते सागर सकट गाण्याच्या कथानकाविषयी सांगतात, “मी नेहमी वास्तववादी कथा करत असतो. जेव्हा अहमदाबाद विमान दुर्घटना घडली. तेव्हा माझ्या मनात असंख्य विचार आले की यात अनेकांनी आपले प्रिय नातेवाईक गमावले असतील. त्या सर्वांना समर्पित अस एक ३ मिनिटाच गाणं करावं. ही कल्पना माझ्या या डोक्यात आली. आणि हे गाण आम्ही करायचं ठरवल.”

सुप्रसिद्ध अभिनेता अजिंक्य राऊत गाण्याच्या चित्रीकरणा दरम्यानचा किस्सा सांगतो, “गिरगावच्या १०० वर्षाहून जुन्या असलेल्या चाळीत आम्ही या गाण्याचं शूट केल. दोन दिवसाच्या शूटमध्ये तीन मिनिटाच्या गाण्यातून आम्ही ही कथा सादर केली आहे. स्पर्श न करता डोळ्यांनी पाहत हळुवार प्रेम फुलत जात. अस एका चाळीतल सुंदर प्रेम तुम्हाला अनुभवायला मिळेल. तसेच प्रेम, आनंद, विरह हे तुम्हाला एकाच गाण्यात पाहायला मिळेल. हे गाण आम्ही दिवाळीच्या दिवसात शूट केल. त्यावेळी चाळीतल्या एका घरी लाडू बनवताना खूप मज्जा आली. मी चाळीत राहिलो नाही आहे. पण मी शूटिंग दरम्यान चाळीत राहण्याचा अनुभव घेतला. या गाण्याच्या संपूर्ण टीमने खूप मेहनत केली आहे. तुम्ही हे गाण नक्की पाहा आणि खूप खूप प्रेम द्या.”

 

 

 By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *