परदेशात फुललेलं मराठी रोमान्स ! अमोल शेटगे दिग्दर्शित, सचिन नाहर आणि अमोग मलाविया निर्मित ‘असा मी अशी मी’ चा पोस्टर लाँच!
२८ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित !
जागतिक पातळीवर मराठी सिनेमाची छाप उमटवण्याचा निर्धार केलेल्या निर्माते सचिन नाहर आणि अमोग मलाविया यांनी प्रेक्षकांसाठी एक हटके प्रोजेक्ट साकारला आहे. यूकेमध्ये शूट झालेला नवा मराठी चित्रपठ ‘असा मी अशी मी’ हा त्यांच्या कल्पकतेचा आणि मेहनतीचा उल्लेखनीय नमुना आहे. या सिनेमाचा पोस्टर नुकताच रिलीझ झाला. पोस्टर वर असलेले कलाकार तेजश्री प्रधान आणि अजिंक्य रमेश देव यांचा डॅशिंग लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. नव्या पिढीच्या रोमँसची झलक देणारा हा पोस्टर पाहताच शूटिंग लंडनमध्ये झाल्याची झटपट चाहत्यांना जाणीव होते. या न्यू-एज प्रेमकथेची कथा नेमकी काय असेल याविषयी आता प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढली आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा येत्या २८ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे.
ही भव्य निर्मिती मॅक्समस लिमिटेड या प्रतिष्ठित बॅनर्स अंतर्गत साकारली आहे. आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान, उत्कृष्ट लोकेशन्स, आणि उच्च दर्जाचा अभिनय एकत्र आणत ही टीम मराठी चित्रपटांचे रूप पूर्णपणे बदलण्याचा प्रयत्न करत आहे. निर्माते सचिन नाहर आणि अनिश शर्मा तसेच सह निर्माते अमोग मलाविया, सुरेश गोविंदराय पै यांचे ध्येय केवळ मनोरंजन देण्यापुरते मर्यादित नसून मराठी प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाचा सिनेमॅटिक अनुभव देण्याचे आहे. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे आणि गुणवत्ता जपण्याच्या वृत्तीमुळे ‘असा मी अशी मी’ एक खास ओळख निर्माण करतो. इतकच नव्हे तर निलेश मोहरीर ह्यांनी सिनेमाला संगीत दिलय.
चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल शेटगे यांनी केले असून, मुख्य भूमिकेत अनुभवी अभिनेता अजिंक्य रमेश देव, प्रेक्षकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान, तसेच इतर भारतीय आणि ब्रिटिश कलाकारांची प्रभावी फळी दिसणार आहे. विविध सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या या कलाकारांमुळे चित्रपटाला एक सुंदर आंतरराष्ट्रीय रंग प्राप्त झाला आहे.
यूकेच्या देखण्या लोकेशन्समध्ये विणलेली ही हळुवार प्रेमकहाणी आधुनिक नातेसंबंधांना भावनिक अंगाने मांडते. जे नक्कीच प्रेक्षकांना थिएटरमध्ये एक ताजेतवाने अनुभव देईल.
२८ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘असा मी अशी मी’ हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होत आहे.
मराठी सिनेमाला ग्लोबल टच देणारी ही निर्मिती प्रेक्षकांसाठी एक खास आणि अविस्मरणीय भेट ठरणार आहे.
By Sunder M
