EntertainmentMarathi

’असुरवन’ चित्रपटाच्या टीमने केली नाशिक येथे गोदा आरती

’असुरवन’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमने उपस्थित समस्त भक्तांच्या साक्षीने गोदा आरती करून नाशिक येथे गोदावरी नदीचे आशीर्वाद घेतले. हर हर गंगे !!! हर हर गोदा!!! ’असुरवन’ चित्रपट येत्या ५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. असुरवन टीम चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान नाशिक दौऱ्यावर होती. त्यांनी नवश्या गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंर काही रेडिओ इंटरव्यूज करून ही टीम नाशिकच्या पंचवटीमध्ये असलेल्या प्राचीन असलेल्या गोदावरी घाटावर “गोदा आरती”साठी पोहोचली. यावेळी असुरवन चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक साचिन रामचंद्र आंबात, अभिनेता विश्वास पाटील, सूरज नेवरेकर, विशाल साठे, अभिनेत्री दीप्ती धोत्रे उपस्थित होते. अतिशय आनंदात हा सोहळा गोदा घाटावर पार पडला. तिथल्या श्री रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने असुरवन चित्रपटाच्या टीमला पुढील वाटलीसाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिला.

स्वप्नस्वरूप प्रस्तुत ‘असुरवन’ चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक सचिन आंबात आहेत. तसेच या चित्रपटात विश्वास पाटील, सुरज नेवरेकर, दीप्ती धोत्रे, अनुज ठाकरे, सचिन चांदवडे, विपुल साळुंखे, विनायक चव्हाण, पूजा मौली, मयूरेश जोशी, रोहिणी थोरात, हर्षद वाघमारे, सिद्धेश शिंदे, विशाल साठे, संदीप पाटील, सूरज परब, योगिता पाखरे, योगेश शेडगे, प्रणव दळवी, तनिषा जाधव, निकिता मेस्त्री, व्यंकटेश गावडे, श्याम सावंत, सनी जाधव, कल्पेश डुकरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘असुरवन’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये महाराष्ट्रातल्या मातीचा गंध पाहायला मिळतोय. महाराष्ट्रातील कोकणाच्या आदिवासी पाड्यातील प्राचीन वारली संस्कृतीची प्रथा, रूढी, परंपरा या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. एका शापीत घनदाट डोंगर माऊलीवर झालेला फिरसत्या देवाचा कोप तसेच उत्सुकता वाढवणारा सूर्याचा मुखवटा असणारा चेहरा नेमका कोणाचा यावर आधारीत हा चित्रपट आहे. या चित्रपटातील “खबर कलली का” या आगरी भाषेतील डायलॉगने या चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे. त्यात थ्रिलर, गूढ, सस्पेन्स आणि ड्रामा सर्वकाही आहे. ट्रेलरमध्येच या सर्व भावनांची झलक पाहायला मिळाली. हा चित्रपट प्रेक्षकांना सस्पेन्स थ्रिलरने घाबरवून निखळ मनोरंजन देणार, यात हलक्या फुलक्या विनोदाची मेजवानी असणार आहे. ’असुरवन’ चित्रपट येत्या ५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

YouTube player

 

 

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *