EntertainmentMarathi

बे दुणे तीन या सीरिज मध्ये अभयची भूमिका साकारलेला अभिनेता क्षितिज दाते काय म्हणाला !

सध्या वेब सीरिज विश्वात चर्चेत असलेली मालिका म्हणजे बे दुणे तीन ! तीन मुलं होणार हे ऐकुन त्यांची उडणारी धांधल यातून अनुभवयाला मिळते.

क्षितिजला विचारण्यात आलं की हे पात्र तुला स्वतःच्या आयुष्याशी किती रिलेटेबल वाटतो? तू त्याच्यासारखा शांत आहेस का, की उलट ? या वर बोलताना क्षितिज सांगतो

“शोमधले सगळे कॅरेक्टर्स माझे आणि शिवानीचे खूप रिलेटेबल आहेत फक्त पुष्कराजने केलेला पोलिसाचा कॅरेक्टर सोडला तर ! कारण हे लोक आमच्यापेक्षा कितीही वेगळे असले तरी ते आपल्या आसपासच्याच लोकांसारखे आहेत. त्यामुळे अभयची भूमिका करणं माझ्या मूळ स्वभावापासून खूप दूर नाही. पण हो अभिनेता म्हणून आपण थोडंसं वेगळं वागण्याचा प्रयत्न करतोच. त्याच्यातली निरागस भीती आणि चिंता माझ्याशी खूप जोडली गेली. कदाचित तो फार खोल विचार करणारा नाही; थोडासा सरधोपट आहे जे माझ्यात नाही. मी नक्कीच ओव्हरथिंकर आहे”

इतकचं नाही क्षितिज ने सेटवर वरच्या फनी ब्लूपर किंवा गोंधळ झाला का ? यावर मजेशीर उत्तर दिलं तो म्हणाला ”
खरं सांगायचं तर मला एखादा खास ब्लूपर आठवत नाही, कारण असे खूप होते. आपण सगळे खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखतो, त्यामुळे सेटवर कोण किती लक्षात आहे आणि कोण गंभीर चेहरा ठेवून आतून हसू दाबत आहे हे लगेच कळायचं. असंख्य वेळा आम्हाला टेक कट करावे लागले कारण हसू आवरतच नव्हतं. विशेषतः पुष्कराजसोबत शूट करताना तो इतका विनोदी अभिनेता आहे आणि त्याचं कॉमिक टायमिंग अफाट आहे. आपण त्याला कितीही ओळखत असलो तरी त्याचं टायमिंग आम्हाला नेहमीच सरप्राईज करतं आणि थक्क करतं”

बे दुणे तीन प्रेक्षकांच्या पसंतीस तर पडते आहे पण आजकालची पिढी देखील ही गोष्ट स्वतः ची आहेत अस सांगताना दिसतात.

 

 

By Sunder 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *