EntertainmentMarathi

‘रुबाब’ चित्रपटातील धमाकेदार ‘पॉम पॉम’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित आगामी मराठी चित्रपट ‘रुबाब’ सध्या आपल्या वेगळ्या आशयामुळे आणि स्टायलिश मांडणीमुळे चर्चेत आहे. आता या चित्रपटाने संगीताच्या पातळीवरही प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली असून, चित्रपटातील दुसरे गाणे ‘पॉम पॉम’ नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पहिल्याच ठेक्यावर थिरकायला लावणारे हे गाणे, जल्लोष, उत्सव आणि आनंदाच्या प्रत्येक क्षणाचा नवा ठेका ठरणार आहे.

लग्नाची वरात असो, पार्टी असो किंवा कोणताही मोठा सोहळा—‘पॉम पॉम’ हे गाणे प्रत्येक जल्लोषात आपोआप रंगत आणणारे आहे. जोशपूर्ण ठेका, उत्साही बीट्स आणि भारावलेला माहोल यामुळे हे गाणे लवकरच सर्वांच्या प्लेलिस्टमध्ये स्थान मिळवेल, हे नक्की. या गाण्यात संभाजी ससाणे आणि शितल पाटील यांचा स्टायलिश, रुबाबदार आणि एनर्जेटिक अंदाज पाहायला मिळतो. दोघांची केमिस्ट्री, अॅटिट्यूड आणि स्क्रीन प्रेझेन्स या गाण्यात विशेष उठून दिसते.

YouTube player

या गाण्याला बॉलिवूडचे लोकप्रिय गायक नकाश अजीज आणि सोनाली सोनावणे यांच्या दमदार व जोशपूर्ण आवाजाची साथ लाभली आहे. त्यांच्या गायकीतून लग्नघरातील उत्साह, जल्लोष आणि आनंदी वातावरण प्रभावीपणे जाणवते. संगीतकार चिनार–महेश यांच्या थिरकायला लावणाऱ्या संगीताने आणि डॅा. विनायक पवार यांच्या मजेशीर, उत्साही शब्दांनी ‘पॉम पॉम’ या गाण्याला खऱ्या अर्थाने धमाल रंग चढवला आहे. तर या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन राहुल ठोंबरे यांनी केले आहे.

दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणतात,
“‘पॉम पॉम’ हे पूर्णपणे जल्लोषासाठीचं गाणं आहे. ‘कसं तरी होतया रं’ या गाण्यातून प्रेक्षकांनी संभाजी आणि शितल यांचा प्रेमळ अंदाज पाहिला, तर या गाण्यात त्यांचा रुबाबदार, एनर्जेटिक अवतार दिसेल. कोणताही सण, समारंभ किंवा पार्टी असो—या गाण्याने माहोल तयार होईल, असा आमचा विश्वास आहे.”

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर हे चित्रपटाचे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर हे प्रस्तुतकर्ते आहेत. संभाजी ससाणे आणि शितल पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार असून, ‘रुबाब’ हा चित्रपट ६ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

 

By Sunder

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *