Entertainment

…आणि तस्करी मुळे अँक्शन सीन करण्याची इच्छा पूर्ण झाली – अक्षया नाईक !

हिंदी मालिका विश्वातल पदार्पण पुढे मराठी टेलिव्हिजन मुळे घरा घरात पोहचलेली सुंदरा सध्या नेटफ्लिक्सवर आलेल्या तस्करी वेब सीरिज मुळे चांगलीच चर्चेत आहे. आजवरच्या तिने सरकरलेल्या भूमिका पेक्षा तस्करी मधली तिची भूमिका ही खूप महत्त्वाची आणि लक्षवेधी ठरतेय.

ग्रेटर कलेश मधून ओटीटी पदार्पण करून पुढे पुन्हा नेटफ्लिक्स वर “तस्करी” सारखी वेब सीरिज मध्ये ती एका वेगळ्या पण तितक्याच महत्वूर्ण भूमिकेत अक्षया झळकताना दिसते. स्वाती साळुंखे या स्मगलिंग करणाऱ्या मुलीचं पात्र तिने एकदम परफेक्ट साकारल आहे. तस्करी ची सुरुवात अक्षया च्या एंट्री पासून होते आणि पुढे हा तस्करीचा खेळ उलगडत जातो.

तस्करी मध्ये तिने पहिल्यांदा अनेक अँक्शन सीन केले आहे या बद्दल बोलताना अक्षया सांगते ” स्वाती साळुंखे भूमिका साकारताना खूप भारी अनुभव तर आला पण माझ्या वाट्याला अनेक अँक्शन सीन देखील आले त्यामुळे हा आनंद द्विगुणत झाला. तस्करी मध्ये एक मोठा अँक्शन स्क्विन्स (sequence) आहे त्यामुळे माझी या भूमिकेसाठी निवड झाल्यापासून तस्करीचे दिग्दर्शक सर माझ्यासाठी दर आठवड्याला मला एक आठवण करून द्यायचे धावण्याची प्रॅक्टिस करत रहा कारण दिवसभरात खूप पळावं लागणारे, फिटनेस कडे लक्ष्य असुदे आणि अखेरीस तो दिवस आला जेव्हा आम्ही अँक्शन सीन शूट करत होतो. हा सीन शूट करण्यासाठी त्यांनी माझ्यासाठी ( बॉडी डबल ) body double मागवली होती पण एकुणेक सीन आणि गोष्टी मी स्वतःहा केल्यामुळे संपूर्ण टीम, अगदी फाइट मास्टर आणि आमचे डायरेक्टर राघव जयरथ पासून ते स्पॉट दादापर्यंत सगळ्यांनी येऊन माझं कौतुक केलं. अनेक वर्ष मला माझी फाइट सीन करायची इच्छा होती आणि या निमित्तानं माझी ती इच्छा पूर्ण झाली”

लॉर्ड इम्रान हाश्मी सोबत काम करण्याची संधी देखील अक्षयाला या निमित्तानं मिळाली आणि तिचा पहिला वहिला एंट्री सीन देखील इम्रान हाश्मी सारख्या अभिनेत्या सोबत असल्यानं तिचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय.

येणाऱ्या काळात अक्षया अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार असून तस्करी नंतर ती काय नवीन घेऊन येणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

 

 

By Sunder

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *