EntertainmentMarathi

मिर्झा राजे जयसिंग यांच्या भूमिकेत पुनीत इस्सर

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा मराठी ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांसाठी एक भव्य आणि उत्कंठावर्धक अनुभव घेऊन येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाडसी आग्रा स्वारीवर आधारित हा चित्रपट केवळ कथा नाही, तर शौर्य, बुद्धिचातुर्य आणि राजकीय मुत्सद्देगिरीचा उत्कंठावर्धक अध्याय आहे. पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित, तसेच दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपट ६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे.

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटात हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते पुनीत इस्सर एका महत्त्वपूर्ण ऐतिहासिक व्यक्तिरेखेत झळकणार आहेत. ते मिर्झा राजे जयसिंग या प्रभावशाली भूमिकेत दिसणार असून, त्यांच्या अनुभवी आणि भारदस्त अभिनयामुळे या व्यक्तिरेखेला एक वेगळेच परिमाण लाभले आहे. मिर्झा राजे जयसिंग ही व्यक्तिरेखा केवळ राजकीय सत्तेचे प्रतीक नसून, रणनीती, कूटनीती आणि सत्तासंतुलनाचा सूक्ष्म खेळ दर्शवणारी आहे.

महाभारत मालिकेतील दुर्योधनासह अनेक संस्मरणीय भूमिकांमुळे ओळखले जाणारे पुनीत इस्सर या भूमिकेतून इतिहासातील या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाला प्रभावीपणे साकारताना दिसतील. भव्य सेट्स, सशक्त पटकथा आणि तगड्या कलाकारांच्या अभिनयामुळे हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा आणि संस्मरणीय टप्पा ठरणार आहे.

कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक (पॅनोरमा स्टुडिओज), विपुल अग्रवाल, जेनील परमार (मुगाफी), मुरलीधर छतवानी (पॅनोरमा स्टुडिओज) चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते रवींद्र औटी (पॅनोरमा स्टुडिओज), तान्शा बत्रा, आलोक शर्मा (मुगाफी) आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.
पॅनोरमा स्टुडिओज ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचे जगभरात (वर्ल्ड वाईड) वितरण करणार आहे.

 

 

By Sunder

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *