EntertainmentMarathi

व्हॅलेंटाइन डेच्या मुहुर्तावर ‘Girlfriend Boyfriend” चित्रपटाची घोषणा

शिवानी बावकर, निखिल वैरागकर यांची मध्यवर्ती भूमिका

व्हॅलेंटाइन डे अर्थात प्रेम दिन सर्व प्रेमिकांसाठी मोठा दिवस असतो. याच प्रेम दिनाच्या मुहुर्तावर “Girlfriend Boyfriend” या नव्या, भव्य चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. उत्तम स्टारकास्ट आणि पुरेपूर मनोरंजन करणारी कथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

शिव लोखंडे आणि ऋतुजा पाटील प्रस्तुतकर्ते असलेल्या या चित्रपटाची निर्मिती करण के के यांनी केली आहे. सरोज परदेशी, समृद्धी राज, विनोद कांबळे सहनिर्माते आहेत व शिवाकांत तिवारी एसोसिएट प्रोड्यूसर आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन रेखा करन यांनी केलं आहे. शिवानी बावकर, निखिल वैरागर, सक्षम कुलकर्णी, ऐश्वर्या शिंदे, अक्षय टंकसाळे, किशोर चौघुले, अभय कुलकर्णी, राजश्री पो्हेकर -कुलकर्णी, समृद्धी राज आणि सोमन चौहान अशी उत्तमोत्तम कलाकारांची फळी या चित्रपटात आहेत. त्यामुळे अव्वल अभिनयाची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे.

“Girlfriend Boyfriend” या चित्रपटात प्रेम, मैत्री, भावना आणि अनपेक्षित वळणांनी सजलेली कथा प्रेक्षकांना एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जाणार आहे. आजच्या आधुनिक नात्यांमधील गुंतागुंत, विश्वास, निष्ठा आणि कमिटमेंटचा खरा अर्थ उलगडणारा हा चित्रपट तरुणाईसाठी खास आकर्षण ठरणार आहे.

प्रेम ही संकल्पना अजरामर आहे. अनेक चित्रपटांतून आजवर प्रेम ही संकल्पना, त्याचे वेगवेगळे पदर उलगडण्यात आले आहेत. मात्र, काळानुरुप प्रेम या संकल्पनेला नवनवे आयाम मिळतात. त्यामुळे आजच्या एआयच्या काळात Girlfriend Boyfriend चित्रपटातून प्रेमाची आणि तरुणाईची गोष्ट कशा पद्धतीने मांडली जाते याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

 

By Sunder

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *