EntertainmentMarathi

अल्ट्रा झकासच्या मनोरंजन विश्वात ‘रेडीमिक्स’ आणि ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ चित्रपट सामाविष्ट

अल्ट्रा झकासच्या मनोरंजन विश्वात ‘रेडीमिक्स’ आणि ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ चित्रपट सामाविष्ट!

मुंबई: संपूर्ण महाराष्ट्रात ‘रेडीमिक्स’ आणि ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ या चित्रपटांनी जोरदार धुमाकूळ घालून रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. दोन्ही चित्रपट आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘रेडीमिक्स’ हा ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर उपलब्ध झाला असून ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ १८ मार्च २०२४ रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

आपल्या मोठ्या बहिणीला प्रेमात मिळालेल्या धोक्याच्या निराशेतून बाहेर काढण्यासाठी नूपुरने आखलेली योजना यशस्वी होईल का, हे रेडीमिक्स चित्रपटात तर गोगलगावातील लोकांना घाणीतून स्वच्छ आणि सुंदर गाव करण्यासाठी अनासपूरेंची योजना यशस्वी होईल का, हे जय स्वच्छमेव जयते बोला या चित्रपटात बघता येणार आहे. ‘रेडीमिक्स’ चित्रपटात वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहेरे आणि नेहा जोशी यांचा जबरदस्त अभिनय पहायला मिळणार असून मकरंद अनासपूरे यांनी ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ चित्रपटात आपल्या विनोदी ढंगाने समाजासाठी एक गंभीर संदेश दिला आहे.

“समाजात मनोरंजन महत्वाचं आहे, त्याचबरोबर समाजाचं प्रबोधनही तेवढंच महत्वाचं आहे. मनोरंजातून प्रबोधन करणारे रेडीमिक्स आणि जय स्वच्छमेव जयते बोला हे चित्रपट प्रेक्षकांना बहाल करताना मनात एक उत्स्फूर्त भावना आहे” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री.सुशीकुमार अग्रवाल म्हणाले.
नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी :- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies

 

 

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *