EntertainmentMarathi

महायुतीच्या महाविजयात ‘धर्मवीर २’चा मोलाचा वाटा

महायुतीच्या महाविजयात ‘धर्मवीर २’चा मोलाचा वाटा

विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविजय मिळवला आहे. या महाविजयात “धर्मवीर २” या चित्रपटानं मोलाची भूमिका बजावली आहे असे नक्कीच सांगता येईल.

“धर्मवीर २” या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई यांनी केली होती. प्रवीण तरडे यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते. प्रसाद ओक, क्षितीश दाते, मंगेश देसाई, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, आनंद इंगळे, अभिजित थिटे, समीर धर्माधिकारी, स्नेहल तरडे आदींनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये चित्रपट देशभरात प्रदर्शित करण्यात आला होता. त्याचप्रमाणे ओटीटीवरही ह्या चित्रपटाला कमालीचा प्रतिसाद मिळाला असून आजही चित्रपट चांगलाच चर्चेत आहे.

“धर्मवीर २” या चित्रपटातून साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट उलगडण्यात आली होती. स्वर्गीय आनंद दिघे यांनी राजकारण आणि समाजकारणाचा सुंदर मेळ घातला होता. २०१९मध्ये भारतीय जनता पक्षासह युती तोडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह सत्तास्थापन करण्यात आली. त्यामुळे हिंदुत्त्वाशी असलेल्या निष्ठेशी तडजोड करावी लागत होती. त्यामुळे हिंदुत्त्वासाठी एकनाथ शिंदे यांनी वेगळा मार्ग कसा निवडला याची गोष्ट चित्रपटातून दाखवण्यात आली. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर उदंड प्रतिसाद मिळाला होता. सप्टेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीला पूरक वातावरण निर्मिती केली. त्याचाच परिणाम महायुतीच्या महाविजयावर झाल्याचे नक्कीच बोलता येईल.

 

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *