महिलांसह पुरुषांचीही ‘गुलाबी’ला पसंती!
महिलांसह पुरुषांचीही ‘गुलाबी’ला पसंती!
व्हॅायलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित ‘गुलाबी’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर, आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून समीक्षकांकडूनही या चित्रपटाची प्रशंसा झाली आहे.
तीन मैत्रिणींची ही कथा आहे जी, स्वत्वाचा शोध घेणारी आहे. ही कथा प्रेक्षकांना भावनिक स्तरावर जोडणारी आहे. फक्त महिलाच नव्हे तर पुरुष प्रेक्षकांनाही हा चित्रपट आपलासा वाटतोय. हे ‘गुलाबी’च्या यशाचे विशेष वैशिष्ट्य आहे असे म्हणण्यास काहीच हरकत नाही!.
चित्रपटाने मैत्रीतील खूप नाजूक नात्यांना सुरेखपणे रंगवले आहे. नातेसंबंध, स्वप्नांच्या पूर्ततेसाठी दिलेली झुंज आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेताना येणाऱ्या अडथळ्यांना एक संवेदनशील दृष्टीकोन दिला गेला आहे. ‘गुलाबी’मध्ये अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी आणि श्रृती मराठे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात, “‘गुलाबी’ हा केवळ चित्रपट नसून तो एक अनुभव आहे जो आपण सर्वांनी आपल्या जीवनात कुठेतरी अनुभवलेला आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजन देत नाही, तर प्रेक्षकांना विचार करण्यास प्रवृत्त करतो. आम्हाला केवळ महिलाच नाही तर पुरुष प्रेक्षकांकडून देखील प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला आहे.”
By Sunder M