EntertainmentMarathi

लग्नाची नवी परिभाषा सांगणारा ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

अथश्री आणि गायत्री देणार का लग्नासाठी होकार ?

शुभम फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, ट्रेलर पाहून या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता आता प्रचंड वाढली आहे. खरंतर टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आल्यापासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात कुतूहल होते. ‘लग्न’संस्थेबाबतचे आधुनिक काळाचे विचार अतिशय हलक्याफुलक्या आणि मजेशीर पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आल्याचे टिझरमध्ये दिसत होते. आता ट्रेलर पाहून या चित्रपटाच्या दुसऱ्याही अनेक बाबी समोर आल्या आहेत. या सगळ्या गोष्टी असतानाच ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’च्या निमित्ताने सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान ही जोडीही पहिल्यांदाच पडद्यावर झळकणार आहे. याव्यतिरिक्त यात प्रदीप वेलणकर, मानसी मागिकर, संजय खापरे, शर्मिष्ठा राऊत यांच्याही भूमिका आहेत. त्यामुळे एकंदरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करणार असल्याचे दिसतेय.आनंद दिलीप गोखले लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे शेखर विठ्ठल मते निर्माते आहेत.

YouTube player

ट्रेलरमध्ये अथश्री आणि गायत्री ही दोन परस्पर विरोधी व्यक्तिमत्वं त्यांच्या लग्नासाठी एकमेकांना पहिल्यांदा भेटताना दिसत असून या दरम्यान काही गंमतीशीर घटना घडताना दिसत आहेत. दोघांचे विचार एकमेकांसोबत शेअर करत असतानाच त्यांच्या आयुष्यातील काही रहस्येही समोर येत आहेत. त्यामुळे यात धमाल तर आहेच तसेच काही ट्विस्टही अनुभवायला मिळणार आहेत. या सगळ्यातून अथश्री आणि गायत्री यांचे लग्न होणार का? हे पाहाण्यासाठी प्रेक्षकांना २० डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, “आजच्या काळात लग्न करताना एकमेकांत बघितल्या जाणाऱ्या गोष्टींवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे. लग्न करताना आता तरुणांची विचारसरणी बदलली आहे, त्यांचा लग्नाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन खूप वेगळा झाला आहे. हा सिनेमा तरुणांना विशेष जवळचा वाटेल. असे असले तरी संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा हा चित्रपट आहे. यात मजा, धमाल तर आहेच प्रसंगी प्रेक्षकांना हळवाही बनवेल. कथानकात सुबोध आणि तेजश्रीच्या जबरदस्त अभिनयाने अधिकच रंगत आणली आहे.”

निर्माते शेखर मते म्हणतात, ‘’विषय थोडा नाजूक असला तरी अतिशय मजेशीर पद्धतीने तो यात मांडण्यात आला आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल.’’

 

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *