EntertainmentMarathi

जीवनातील वडिलांचे अनन्य साधारण महत्व पटवून देणारी कहाणी -“श्री गणेशा “

जीवनातील वडिलांचे अनन्य साधारण महत्व पटवून देणारा चित्रपट “श्री गणेशा” एम एच १२ सिने मीडियाने आउट ऑफ द बॉक्स फिल्म च्या सहकार्याने संजय माणिक भोसले आणि कांचन संजय भोसले निर्मित व मिलिंद कवडे दिग्दर्षित २० डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रच्या विविध सिनेमागृहात रिलीज होत आहे.

चित्रपटात वडील भाऊसाहेब पाटील (शशांक शेंडे) आणि त्याचा मुलगा सदानंद पाटील उर्फ टिकल्या (प्रथमेश परब) यांच्यातील ताणलेल्या नात्याची कथा दाखवण्यात आली आहे.आणि त्यानंतर त्यांचे झालेले प्रेमात रूपांतर पाहायला मिळते.

टिकल्या हा आपल्याला वाईट गुणांमुळे बालसुद्धारगृहात राहत असतो.  त्याचे वडील आईचे आजारपणाचे कारण सांगून बाल सुधारगृहातून स्वतःच्या जबाबदारी वर आईला भेटायला नेत असतो. तेथून निघाल्या नंतर त्यांना विविध लोकं, त्यांच्या रोड ट्रिप मध्ये भेटतात व रोड ट्रिप मध्ये झालेली धम्माल व भावनास्पर्शी क्षण अनुभवायला आपल्याला या सिनेमांत पाहायला मिळतात.

सुरवातीस वडील,(शशांक शेंडे )हा एक प्रामाणिक आणि सरळ माणूस, टिकल्याशी (प्रथमेश परब )संपर्क साधण्यासाठी धडपडत असतो जो त्याच्या खोडकर आणि अप्रामाणिक मार्गांसाठी ओळखला जातो. त्यांच्या सततच्या संघर्षांमुळे हे स्पष्ट होते की ते एकमेकांना सहन करू शकत नाहीत.

प्रवासाची सुरुवात कटुतेने होते, वाद आणि विचित्र शांततेने भरलेली असते, कारण दोघांनाही दुसऱ्याच्या सहवासात राहायचे नसते. तरीही, जसजसे मैल जातात तसतशी ही सहल विनोदी आणि हृदयस्पर्शी घटनांची मालिका बनते.

वाटेत, त्यांना विचित्र पात्रांचा सामना करावा लागतो, अनपेक्षित आव्हानांना सामोरे जावे लागते आणि अशा परिस्थितींमध्ये त्यांना एकमेकांवर अवलंबून राहण्यास भाग पडावे लागते . या क्षणांद्वारे, वडील आणि मुलगा एकमेकांना नवीन प्रकाशात पाहू लागतात, हळूहळू गैरसमज दूर होते आणि संतापाच्या भिंती तुटल्या जातात.प्रवासात त्यांना एक फूड ब्लॉगर (मेघा शिंदे ) भेटते आणि त्यांच्या संघर्षमय प्रवासाचे विनोदी सहलीत रूपांतर होते.

पुढे दोघे मालवणला तिच्या घरी तिला सोडतात तिचे वडील भाई वेंगुर्लेकर (संजय नार्वेकर ) आपल्याला कहाणी तून टिकल्या व त्याच्या वडिलांना एक वेगळीच शिकवण देऊन जातात त्यानंतर दोघे बापलेक त्याचा आईच्या गावाला जाऊन खरंच त्याच्या आईला भेटतात का ? व मरणाच्या दारात नक्की कोण येऊन ठेपलेले असतें ?आपल्या शेवटच्या क्षणी कोणाला,कोणा बरोबर राहायचे असते याची उत्तरे आपल्याला हा सिनेमा पाहाल्यानंतरच मिळतील

सदानंद उर्फ ​​टिकल्या आणि भाऊसाहेब पाटील यांची एक अनोखी केमिस्ट्री या चित्रपटात आपल्याला मिळते .दोघांनीही उत्तम भूमिका निभावल्या आहेत.संजय माणिक भोसले आणि कांचन संजय भोसले निर्मिती असून चित्रपट मिलिंद कवडे दिग्दर्शित हास्य आणि वेडेपणाचा दुहेरी धमाका आहे.त्याला त्यांनी व्यवस्थित न्याय दिला आहे.रवी माणिक भोसले आणि महेश माणिकभोसले यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा मिलिंद कवडे यांनी लिहिली असून पटकथा संजय नवगिरे यांनी लिहिली आहे. संवाद संजय नवगिरे यांनी लिहिले आहेत. ‘श्री गणेशा… होवू दे रे होवू दे…’ हे गाणे आणि “मधुबाला” हे विशेष तडका गाणे पाहायला मिळते प्रथमेश परब आणि शशांक शेंडे प्रमुख भूमिकेत दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी यापूर्वी कधीही न पाहिलेल्या लूकमध्ये सादर केले आहेत. प्रथमेशचे प्रथमच यामध्ये केस खूपच लहान आहेत. याउलट, शशांक क्लीन शेव्ह लूक आहे. यात प्रथमेशसोबत मेघा शिंदेची जोडी उत्तम आहे. या सर्वांसोबतच संजय नार्वेकर आपल्या खास शैलीत भाव खाऊन गेलेत. त्यांनी भाई वेंगुर्लेकर यांची भूमिका उत्तम केली आहे.

‘श्री गणेशा’चे छायाचित्रण डीओपी हजरत शेख वली यांनी केले आहे. गीतकार जय अत्रे आणि मंदार चोळकर यांनी या गीतांना संगीत दिले असून संगीतकार वरुण लिखाते यांनी सुरेल संगीत दिले आहे. पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांनी तर संकलन गुरु पाटील यांचे आहे. कला दिग्दर्शन सुमित पाटील यांचे असून नृत्य दिग्दर्शन राहुल ठोंबरे यांचे आहे. या चित्रपटाची कार्यकारी निर्मिती दीपक एस कुदळे (पाटील) आणि सहयोगी दिग्दर्शन विनोद शिंदे यांनी केले आहे.

 

 

By Sunder M

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *