मित्रांची धमाल घेऊन येतोय ‘संगी’ येत्या १७ जानेवारीला होणार प्रदर्शित
मित्रांची धमाल घेऊन येतोय ‘संगी’
येत्या १७ जानेवारीला होणार प्रदर्शित
अर्मोक्स फिल्म्स आणि यंत्रणा फिल्म्स निर्मित , सुप्रीम मोशन पिक्चर्स आणि सत्यम ज्वेलर्स प्रस्तुत ‘संगी’ हा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमित कुलकर्णी यांनी केले असून लेखन थोपटे विजयसिंह सर्जेराव यांचे आहे. रोहन भोसले, अरुण प्रभुदेसाई, पिंटू सॉ, मोनिका प्रभुदेसाई, प्रतीक ठाकूर, सुमित कुलकर्णी हे ‘संगी’चे निर्माते आहेत. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि राहुल किरणराज चोप्रा सहनिर्माते आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून यात शरीब हाश्मी, संजय बिष्णोई, श्यामराज पाटील, विद्या माळवदे आणि गौरव मोरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
संगी म्हणजेच मैत्री… त्यामुळे याचे कथानक मैत्रीभोवती फिरणारे आहे. मात्र पोस्टरमध्ये तीन मित्र दिसत असतानाच काही नोटाही दिसत आहेत. त्यामुळे आता पैसे आणि मैत्री यांचा एकमेकांशी काय संबंध असणार हे जाणून घेण्यासाठी १७ जानेवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. एकंदरच हलकीफुलकी, हास्य आणि मनोरंजनाने भरलेली कथा असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवणारा असेल, हे नक्की !
चित्रपटाचे दिग्दर्शक सुमित कुलकर्णी म्हणाले, ” ‘संगी’ हा फक्त एक चित्रपट नाही तर प्रत्येकाच्या आयुष्यातील हास्यरसाचा अनुभव आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट असला तरी घरातील प्रत्येकाने हा चित्रपट आपल्या मित्रपरिवारासोबत आवर्जून पाहावा. हा चित्रपट अनेकांना नॉस्टॅल्जिक बनवेल. ‘संगी’ विनोदी चित्रपट असला तरी यात भावनाही दडलेल्या आहेत.”
By Sunder M