EntertainmentMarathi

महाराष्ट्राच्या प्रत्येक मनाला लायटिंग करत आनंद देणारं फसक्लास प्रेमगीत “मनाला लायटिंग” प्रेक्षकांच्या भेटीस!

महाराष्ट्राच्या प्रत्येक मनाला लायटिंग करत आनंद देणारं फसक्लास प्रेमगीत “मनाला लायटिंग” प्रेक्षकांच्या भेटीस!

बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ मधील नवीन रोमँटिक गाणं ‘मनाला लायटिंग’ हे नुकतंच प्रदर्शित झालं आहे. लग्नानंतरच्या प्रेमळ क्षणांवर आधारित असलेल्या या गाण्यात सोनू आणि कोमलच्या अरेंजवाल्या लव्हस्टोरीचा गोडवा, त्यांच्या नव्या नात्यातील जवळीक पाहायला मिळत आहे. शिवाय तायडी आणि दाजींचं लग्नानंतरचं प्रेम आणि पप्पूचं हरवलेलं प्रेम सुद्धा बघायला मिळतंय. अमेय वाघ-राजसी भावे, क्षिती जोग- हरीष दुधाडे, सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर या जोडप्यांचा गोड अंदाज या गाण्यात दिसतोय. अमितराज यांच्या संगीताने आणि क्षितिज पटवर्धन यांच्या शब्दांनी या गाण्याला एक वेगळाच श्रृंगारीक साज चढवला आहे. तर अमितराज यांच्याच आवाजातून व्यक्त झालेला प्रेमभाव संगीतप्रेमींना भावणारा आहे.

निर्माते भूषण कुमार म्हणतात, “’मनाला लाइटिंग’ गाणं हे प्रेक्षकांना प्रेमाच्या दुनियेत घेऊन जाईल. सोनू आणि कोमल यांचं हळवं प्रेम आणि गोड केमिस्ट्री या गाण्यात पाहायला मिळते. हे गाणं आपलं आहे, असे प्रत्येक प्रेक्षकाला वाटेल. सोनू आणि कोमलचा लग्नानंतरचा हा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”

आनंद एल राय यांनी सांगितलं, “लग्न झाल्यानंतरचे सुरुवातीचे क्षण सर्वांसाठीच खूप खास असतात. प्रत्येक जोडप्याच्या नात्यातील हे सुंदर क्षण दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. या गाण्याची संगीत टीम कमाल आहे.’’

दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “अरेंज मॅरेजनंतरचे काही दिवस एकमेकांना समजून घेण्यात जातात. एकमेकांच्या सहवासात घालवलेला तो प्रत्येक क्षण खूप गोड असतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रोमान्स दडलेला असतो. प्रेम हळुवार खुलत असते. एकदंरच हे सोनेरी क्षण दाखवण्याचा प्रयत्न आम्ही याच केला आहे. लग्नं झालेल्या, होऊ घातलेल्या किंवा तशी स्वप्नं बघणाऱ्या प्रत्येकाला हे गाणं आपलंसं करून टाकणार याची मला खात्री आहे.’’

हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित “फसक्लास दाभाडे” येत्या २४ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टी-सीरीज, कलर येल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी निर्मित ‘फसक्लास दाभाडे’चे भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्माते आहेत. चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओज करत आहे.

YouTube player

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *