EntertainmentMarathi

लव फिल्म्सचा महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे यांच्यासोबत २५ एप्रिल ला रिलीझ होणारा तेजस देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’ या मल्टिस्टारर मराठी फिल्म द्वारे चित्रपटसृष्टीत प्रवेश!

लव फिल्म्सचा महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे यांच्यासोबत २५ एप्रिल ला रिलीझ होणारा तेजस देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’ या मल्टिस्टारर मराठी फिल्म द्वारे चित्रपटसृष्टीत प्रवेश!

“देवमाणूस” हा नव्या वर्षातील सर्वाधिक प्रतिक्षीत मराठी चित्रपटांपैकी एक आहे, हा बहुप्रतीक्षित सिनेमा २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तू झुठी मैं मकार, दे दे प्यार दे, मलंग, सोनू के टीटू की स्वीटी, आणि वध यांसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमा बनवणारे पॉवरहाऊस म्हणजेच लव रंजन आणि अंकुर गर्ग यांचा लव फिल्म्स हा प्रोडक्शन हाऊस या मराठी सिनेमाची निर्मिती करत आहे.
तेजस देऊस्कर दिग्दर्शित “देवमाणूस” हा एक मल्टिस्टारर सिनेमा आहे ज्यामध्ये अभिनेते महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक नवी आणि आकर्षक कथा घेऊन येणार आहे हे नक्की.
देवमाणूस या चित्रपटामध्ये कॉन्ट्रास्टींग कॅरेक्टर्स आणि उत्कृष्ट अभिनयासह, अविश्वसनीय कलाकार आहेत. आता पर्यंत निर्मित केलेल्या हिंदी सिनेमांच्या यशापलीकडे जाऊन लव फिल्म्स मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत, प्रॉडक्शन हाऊसची सर्जनशील क्षितिजे वाढवतो आहे हे मात्र खरय. यंदा प्रेक्षकांना, मराठीशी जोडलेला अस्सल अनुभव देऊन, या प्रदेशातील परंपरा, संस्कार आणि मूल्ये समोर आणून लव्ह फिल्म्स काहीतरी वेगळं देणार आहे.
देवमाणूसबद्दल बोलताना दिग्दर्शक तेजस देऊस्कर म्हणतात, “देवमाणूस प्रेक्षकांना वेग वेगळ्या भावनांचा अनुभव देईल. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ सारखे उत्तम कलाकार ह्यात आहेत ज्यामुळे चित्रपटात असलेली पात्र मी पडद्यावर अक्षरशः जिवंत करू शकलो आहे. आम्ही निर्माण केलेले हे जग प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी मी उत्सुक आहे.”
लव फिल्म्सच्या मराठी चित्रपटसृष्टीतील उपक्रमाबद्दल बोलताना, निर्माते लव रंजन म्हणाले, “महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, कला, संगीत आणि कथाकथनाने पिढ्यान पिढ्या प्रेक्षकांना प्रेरणा दिली आहे. मराठी चित्रपटांच्या या जगात पाऊल ठेवताना आम्हाला आनंद होत आहे. देवमाणूस हा पहिला मराठी चित्रपट आम्ही निर्मित केला असून या मराठी परंपरेला आमची आदरांजली आहे. हा या मराठी भूमीचा आणि तिथल्या लोकांच्या भावनेचा उत्सव आहे.”
इतकच नव्हे तर निर्माते अंकुर गर्ग सांगतात, “लव फिल्म्समध्ये, आम्ही प्रेक्षकांना कथा सांगण्याचे प्रयत्न करतो जे खोलवर त्यांच्याशी जोडलेल्या असतात. देवमाणूस सारख्या सिनेमा सोबत मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश करणे हा आमच्यासाठी एक रोमांचक नवीन अध्याय आहे. हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील आकर्षक कथा, बारकावे आणि समृद्ध वारशाचा गौरव करतो पण सर्व काही अस्सल मुळाशी जोडून. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके यांसारख्या कलाकार आणि तेजस यांच्या दिग्दर्शनाच्या उल्लेखनीय प्रतिभेने आम्ही एकत्रितपणे एक अविस्मरणीय अनुभव देण्याचे वचन देतो जो प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने गुंतवेल.”

About Luv Films:

लव फिल्म्स बद्दल: लव फिल्म्स हे लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी २०१२ मध्ये स्थापन केलेले एक भारतीय चित्रपट निर्मिती प्रोडक्शन हाऊस आहे जे आकर्षक चित्रपट तयार करण्यासाठी आणि वितरित करण्यासाठी समर्पित आहे. लव फिल्म्सने विविध प्रकारच्या व्यावसायिक ब्लॉकबस्टर आणि समीक्षकांनी प्रशंसित चित्रपटांची निर्मिती केली आहे, ज्यात छलांग, कुत्ते, वाइल्ड वाइल्ड पंजाब यांचा समावेश आहे. कंपनीच्या आगामी प्रकल्पांमध्ये बहुप्रतिक्षित दे दे प्यार दे २, सौरव गांगुलीवरील बायोपिकचा आणि इतर अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *