Saturday, April 19, 2025
Latest:
EntertainmentMarathi

अनुश्री फिल्म्सच्या नव्या वर्षातील पहिल्याच प्रोजेक्टचा मुहूर्त संपन्न, अभिनेत्री सुरभी सोबत चित्रीकरणाला सुरुवात

अनुश्री फिल्म्सच्या नव्या वर्षातील पहिल्याच प्रोजेक्टचा मुहूर्त संपन्न, अभिनेत्री सुरभी सोबत चित्रीकरणाला सुरुवात

आंबट गोड, लक्ष्मी सदैव मंगलम तसेच जय मल्हार मालिकेतून म्हाळसा या भूमिकेतून घरोघरी पोहोचलेली गुणी अभिनेत्री सुरभी हांडे अनुश्री फिल्म्सच्या नव्या प्रोजेक्टमधून झळकणार आहे. तिने नुकतेच नव्या प्रोजेक्टच्या मुहूर्ताचे फोटोज सोशल मीडियावर शेयर केले आहेत. या फोटोवरून असे दिसते की या प्रोजेक्टच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. भावभक्ती विठोबा, गजानना, गाव कोकण, लढला मावळा रं, अशी सुंदर गाणी तसेच त्या दोघी, देवी, शालिनीझ होम किचन असे विविध सामाजिक विषयावर भाष्य करणारे शॉर्टफिल्म्स अनुश्री फिल्म्स अंतर्गत प्रदर्शित झाले आहेत. या नव्या प्रोजेक्टचे दिग्दर्शन शुभम घाटगे करत आहे. तर या प्रोजेक्टचे निर्माते मयूर तातुस्कर हे आहेत.

अभिनेत्री सुरभी तिच्या नव्या प्रोजेक्टविषयी सांगते, “वर्षातला हा माझा पहिलाच प्रोजेक्ट आहे. शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली आहे. मी फार उत्सुक आहे अनुश्री फिल्म्सच्या टीमसोबत काम करायला. आमच्या प्रोजेक्टच चित्रीकरण महाराष्ट्रातील काही दुर्गम भागात होणार आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे थोड अडव्हेंचर्स असणार आहे.”

निर्माते मयूर तातुस्कर त्यांच्या नव्या प्रोजेक्टविषयी सांगतात, “आमच्या अनुश्री फिल्म्सच्या नव्या वर्षातील नवीन प्रोजेक्टला नुकतीच सुरुवात अगदी दिमाखात आणि उत्साहात झाली आहे. आम्ही नेहमीच प्रेक्षकांसाठी हृदयाला भिडणाऱ्या कथा घेऊन आणण्याचा प्रयत्न करत असतो. या प्रोजेक्टमध्ये देखील तुम्हाला काहीतरी नव पाहण्याचा अनुभव मिळेल याची आम्हाला खात्री आहे. यावेळी आम्ही पहिल्यांदाच प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी यांच्या सोबत काम करत असून हा अनुभव अतिशय प्रेरणादायी ठरत आहे. सुरभी हांडे या मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री असून त्यांच्या अभिनयामुळे आणि कामातील उत्साहामुळे आमच्या टीमला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळाली. यामुळे आमच्याकडून एक सुंदर कलाकृती निर्माण होईल असा विश्वास आहे. अनुश्री फिल्म्सला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे त्यासाठी त्यांचे मनापासून आभार.”

दिग्दर्शक शुभम घाटगे चित्रीकरणाविषयी सांगतो, “लहानपणी सुरभीची भूमिका असलेली मालिका टीव्हीवर आई सोबत बघितली होती. आज त्यांच्यासोबत काम करताना खूप भारी वाटतंय. शूट खूप दुर्गम ठिकाणी असल्यामुळे खूप कमी सुविधा आहेत. पण सुरभीचा आणि आमच्या टीमचा छान रॅपो जमला आहे. त्यामुळे शूट करताना फार मज्जा येईल. खूप उत्सुकता आहे शूट बद्दल. कारण धरणाचा भाग, जंगल, कच्चे रस्ते ह्यातून सगळे गियर घेऊन जायच आहे. तसेच जनावरांचा व थंडीचा धोका पण आहेच. पण सह्याद्रीच्या या अनएक्सप्लोर खजिन्यातून नक्कीच आमच्या हाती काहीतरी अद्भुत लागेल हे नक्की!”

अभिनेत्री सुरभी हिची प्रमुख भूमिका असलेला हा प्रोजेक्ट कोणता असेल याची उत्सुकता सर्व प्रेक्षकांना लागली आहे. https://www.instagram.com/p/DFcNKOIz0n3/?igsh=MWI3cTNsN29rbjF3dQ==

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *