EntertainmentMarathi

अंकुश चौधरी प्रथमच झळकणार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत वाढदिवसानिमित्ताने ‘पी.एस.आय.अर्जुन’ची घोषणा

अंकुश चौधरी प्रथमच झळकणार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेतवाढदिवसानिमित्ताने ‘पी.एस.आय.अर्जुन’ची घोषणा.

यापूर्वी प्रेक्षकांनी अंकुशला रोमँटिक, ॲक्शन हिरोच्या अंदाजात पाहिले आहे. मात्र या चित्रपटात अंकुश एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. सध्या तरी या चित्रपटात कोण कलाकार झळकणार हे समोर आले नसले तरी लवकरच याबद्दलची माहिती प्रेक्षकांसमोर येईल.

चित्रपटाचे निर्माते विक्रम शंकर म्हणतात, “ या चित्रपटाच्या माध्यमातून मी मराठी सिनेसृष्टीत निर्माता म्हणून पदार्पण करत आहे. यापूर्वी मी विविध भाषेत चित्रपटांची निर्मिती केली आहे. परंतु मला मराठीबद्दल नेहमीच कौतुक राहिले आहे. मुळात मराठी प्रेक्षक जाणकार आहेत. त्यांना वैविध्यपूर्ण विषय आवडतात. हा विषयही खूप वेगळा आहे आणि म्हणूनच मी या चित्रपटाची निवड केली. त्यात अंकुश चौधरीसारखा प्रतिभावान अभिनेता या चित्रपटाला लाभला आहे, त्यामुळे हा एक उत्तम योग जुळून आला आहे. अंकुश मराठीतील एवढा मोठा अभिनेता असूनही त्याचे आम्हाला खूप सहकार्य लाभले. आज आमच्या संपूर्ण टीमकडून ही त्याला वाढदिवसाची भेट.’’

YouTube player

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *