‘महादेव’च्या टीमकडून अंकुश चौधरीला खास बर्थडे गिफ्ट जबरदस्त मोशन पोस्टर प्रदर्शित
‘महादेव’च्या टीमकडून अंकुश चौधरीला खास बर्थडे गिफ्ट
जबरदस्त मोशन पोस्टर प्रदर्शित
मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अंकुश चौधरी याला आपण नेहमीच वेगवेगळ्या आणि दमदार भूमिकेत पाहिले आहे. प्रेक्षकांना अकुंशचा धमाकेदार अभिनय पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार. वाढदिवसानिमित्ताने ‘महादेव’च्या संपूर्ण टीमने नवीन मोशन पोस्टर प्रदर्शित करून अंकुशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
स्वामी मोशन पिक्चर्स, शुभारंभ मोशन पिक्चर्स निर्मित, तेजस लोखंडे दिग्दर्शित ‘महादेव’च्या या नवीन मोशन पोस्टरने प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. पोस्टरमध्ये अंकुश चौधरी लढवय्या रूपात दिसत आहे. अंकुशचा हा नवा अवतार जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
By Sunder M