EntertainmentMarathi

‘आरडी’ चित्रपटाचा दमदार टीजर लॉन्च

‘आरडी’ चित्रपटाचा दमदार टीजर लॉन्च

आयुष्यात एखादी चूक घडते. पण ती चूक किती मोठी त्यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात. अशाच एका तरूणाच्या चुकीमुळे घडणाऱ्या नाट्यमय परिणामांची थरारक कहाणी “आरडी” या आगामी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येणार आहे. २१ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा रंजक टीजर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.

साद एंटरटेन्मेंट, कमल एंटरप्रायझेस यांनी झेब्रा पिक्चर्स आणि हेलिक्स प्रॉडक्शन्स यांच्या सहाय्याने आरडी चित्रपटाची निर्मिती केली आहे. आदित्य नाईक, साहिल वढवेकर, हंसराज भक्तावाला, इस्तेखार अहमद शेख हे चित्रपटाचे निर्माते तर ऋग्वेद डेंगळे, शिवराज पवार, गणेश शिंदे हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन गणेश शिंदे यांनी केलं आहे. बी. आप्पासाहेब यांनी सहलेखन आणि सहदिग्दर्शन, हर्षवर्धन जाधव आणि मयूर सातपुते यांनी संकलन, तन्मय ढोक यांनी छायांकन, सुरेश पंडित, वरूण लिखाते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात गणेश शिंदे, अवंतिका कवठेकर, राहुल फलटणकर, बुशरा शेख, केतन पवार, सानवी वाळके यांच्या प्रमुख भूमिका आहे.

तारुण्याच्या काळात आकर्षण आणि उत्साहाच्या भरात काहीवेळा हातून चूका घडतात. पण त्या चुका लक्षात घेऊन, माफी मागून वागणुकीत बदल करायचा असतो. चुकीबद्दल माफी न मागितल्यास भविष्यात त्याचे विचित्र परिणामही होऊ शकतात. अशाच परिणामांची थरारक गोष्ट आरडी या चित्रपटातून उलगडल्याचं टीजरमधून दिसतं आहे. नव्या दमाच्या टीमचा आश्वासक प्रयोग टीजरमधून स्पष्ट होत आहे. ॲक्शन, थ्रिलर अशा प्रकारातला हा चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षकांना नक्कीच पुरेपूर मनोरंजन अनुभवता येणार आहे.

YouTube player

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *