‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाची टीम श्री सिद्धिविनायक चरणी नतमस्तक…!
‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाची टीम श्री सिद्धिविनायक चरणी नतमस्तक…!
‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा चित्रपट उद्या सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला यश मिळावे यासाठी चित्रपटाच्या टीमने श्री सिद्धिविनायक चरणी दर्शन घेऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतले. संत निवृत्ती महाराज, संत सोपान, संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताई या भावंडांचे नाते अतिशय आदर्शवत, सुंदर असेच होते. या भावंडांच्या संतपणाची महती सांगत, संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या कुटुंबाची चरित्रगाथा ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमांतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचणार आहे. दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित हा भव्य चित्रपट १८ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे.
By Sunder M