“मुक्कम पोस्ट देवाच घर” हा पाच भारतीय भाषांमध्ये डब केलेला पहिला मराठी चित्रपट
“मुक्कम पोस्ट देवाच घर” हा पाच भारतीय भाषांमध्ये डब केलेला पहिला मराठी चित्रपट
हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये हा चित्रपट डब करण्यात आला
मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अभूतपूर्व पाऊल टाकत, बहुचर्चित चित्रपट “मुक्कम पोस्ट देवाच घर” हा पाच भारतीय भाषांमध्ये डब करून प्रदर्शित झालेला पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये हा चित्रपट डब करण्यात आला असून मराठी चित्रपट बनला आहे.प्राईम व्हिडिओवर आपल्याला या चित्रपटाचा आनंद लुटता येणार आहे.
कीमाया प्रॉडक्शन्स निर्मित आणि निर्माते महेश कुमार जायस्वाल आणि कीर्ती जायस्वाल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मराठी भाषेत जेव्हा आम्ही हा चित्रपट प्रदर्शित केला तेव्हा आम्हाला प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम, अभिप्राय याचा विचार करून आम्ही हा चित्रपट इतर भाषांमध्ये डब करण्याचा निर्णय घेतला. चित्रपटाची कथा ही कोणत्याही एका विशिष्ठ भाषेतील लोकांची नसून आपल्या सर्वांच्या सभोवताली घडणारी अशी आहे. ही कथा देशभरातील अधिकाधिक लोकांपर्यंत आणि घरांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे असे चित्रपटाचे निर्माते म्हणाले.
निरागसता, उबदारपणा आणि भावनिक खोलीने भरलेले एक मार्मिक कथानक, “मुक्कम पोस्ट देवाच घर” या चित्रपटाने त्याच्या मूळ मराठी स्वरूपात आधीच जिंकले आहे. आकर्षक कथा, आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने जागतिक स्तरावर रिलीजची योजना सुरू असल्याची देखील टीमने आता केली.
By Sunder M