EntertainmentMarathi

एक नवी पायवाट एक नवी भूमिका मालिका सुरू होण्यापूर्वी आदिनाथ कोठारेने शेयर केली खास भावना…

म्हणून नशिबावर सगळं सोडून दिलं अस का म्हणतो आदिनाथ कोठारे !

नॅशनल अवॉर्ड विनर फिल्ममेकर एक उत्कृष्ट निर्माता अभिनेता दिग्दर्शक आदिनाथ कोठारे ने आजपासून एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आणि मनातली धाकधूक, उत्सुकता अश्या मिक्स फिलिंग त्याने एका व्हिडिओ मधून सोशल मीडिया वर शेयर केल्या. आजवर अनेक दर्जेदार कलाकृती घडवताना आता तो टीव्ही माध्यमातून रोज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

” नशीबवान ” या मालिकेतून आदिनाथ आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार आहे. नशीबवान ही मालिका त्याचासाठी दुहेरी कारणासाठी खास अजून निर्मिती आणि अभिनय दोन्ही धुरा तो सांभाळणार आहे. आता हा रूद्रप्रताप या दोन्ही भूमिका कश्या साकारणार हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.

एकीकडे बॉलिवुड मध्ये असलेले बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स आणि आता आदिनाथची मालिका हे सगळंच बघण्यासाठी प्रेक्षक देखील तितकेच उत्सुक आहेत. कामाचा वाढता व्याप असला तरी ही सगळी प्रोसेस तो अगदी हसतमुखपणे सांभाळताना दिसतो.

या बद्दल बोलताना आदिनाथ सांगतो “आजपासून आमची मालिका तुमच्या भेटीला तर येतेय पण आज वर माझ्या प्रत्येक कलाकृतीला जितकं प्रेम दिलं तेवढं या मालिकेला सुद्धा द्याल ! आज या मालिकेचा एक कलाकार आणि निर्माता म्हणून मनात धाकधूक, उत्सुकता दडपण सगळं आहे पण तुमच्या आशीर्वादाने सगळचं छान निभावून जाईल यात शंका नाही. एक नवी पायवाट एक नवी भूमिका तर आहे पण तुमच प्रेम कायम राहू दे बाकी सगळं नशिबावर आहे”

आदिनाथ येणाऱ्या काळात गांधी , रामायण आणि अश्या अनेक उत्कंठावर्धक बॉलिवुड प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार असून सोबतीला स्वतःची निर्मिती असलेल्या “झपाटलेला 3” आणि दिग्दर्शन असलेल्या “जय मल्हार” सारख्या चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे.

 

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *