एका सामान्य माणसाच्या संघर्ष आणि लढ्याची असामान्य कहाणी -“रिलस्टार “
एक सामान्य माणूस आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर सहन करीत असतो.पण जेव्हा त्याच्या सहन शक्तीचा अंत होतो तेव्हा तो अख्खी व्यवस्था हादरवून सोडतो हे दाखवण्याचा प्रयत्न “रीलस्टार” या चित्रपटाच्या माध्यमातून जे फाईव्हज एंटरटेनमेंट, फिनिक्स ग्रुप आणि इनिशीॅटिव्ह फिल्म च्या बॅनरखाली जोस अब्राहम, मोनिका आणि निशील कंबाती यांच्या निर्मितीने, दिग्दर्शक सिम्मी आणि रॉबिन यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
एक गरीब कुटुंबातील सामान्य व साधारण माणूस भानुदास नागरगोजे (भूषण मंजुळे ) रस्त्यावरील खेळणी विक्रेता, सायकलवर साहित्य विकत आपले कुटुंब पत्नी अनिता (उर्मिला जगताप )आणि दोन लहान मुले (अर्जुन गायकर व तनिष्का म्हाडशे ) यांच्या सोबत आपला उदरनिर्वाह करीत असतो. आणि तो मनोमन आपली एक मोटरसायकल असावी असे स्वप्न पाहत असतो.आणि त्याला त्याची पत्नीही दुजोरा देते.सोबतच त्याला रील बनवण्याचा छंद असतो. त्या मध्यमातून तो घराघरात पोहचून एक प्रसिद्ध रिलस्टार बनलेला असतो.
त्याच वेळी राष्ट्र ज्वाला वृत्त वाहिनीचा एक धडाडीचा व महत्वकांशी पत्रकार सुमित राणे (प्रसाद ओक)न्यायाधीश राठोड च्याच्या संशयित मृत्यू बाबत चॅनल हेड (अनंत महादेवन ) व प्रेमिका दिव्या कुलकर्णी (रुचिरा जाधव)
यांच्या सोबत बातमी प्रसिद्ध न होण्याच्या कारणावरून नाराज होऊन चॅनल सोडण्याचा निर्णय घेतो.
इकडे भानुदास मोटर सायकल घेण्यासाठी तात्या कांबळे (मिलिंद शिंदे) बँक चेअरमन, हॉटेल मालक व एक अट्टल गुन्हेगार, अंमली पदार्थ तस्कर, राजकीय पक्षाचा नेता,असलेल्या व्यक्तीच्या बँकेतून लोन घेऊन मोटार सायकल घेतो आणि आपले व आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करतो.. परंतु त्यांचे हे स्वप्न जास्त काळ टिकत नाही.
भानुदास ज्या बाजारात खेळणी विकत असतो त्या ठिकाणी पालिकेचे लोक त्रास देत असतात. त्यामध्ये भानुदास चा मित्र अशोक गायकवाड (कैलास वाघमारे)व इतर मित्र त्यास हप्ता देण्यास नकार देतात.. यात राजकीय लाभ घेण्यासाठी तात्या बाजार समिती आंदोलन करून. त्यात त्याच्याच माणसा करवी गोंधळ घालतो. लाठीचार्ज होताना प्रचंड बॉम्बस्फोट होतो.
त्यामध्ये भानुधास याची मोटारसायकल लापता होते…
मग हा बॉम्बस्फोट कोण करतो?
भानुधासची लापता झालेली मोटर सायकल त्याला परत मिळते का?पुढे त्याला मोटार सायकल मिळवण्यासाठी कोणता संघर्ष करावा लागतो आणि या संघर्षात
पत्रकार सुमित राणे त्याला कशी मदत करतो ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला चित्रपट पहिल्या नंतरच मिळतील.
आधुनिक काळात लोकांचे मनोरंजन करण्यासाठी रील्स बनवणाऱ्या तळागाळातील कलाकारांच्या प्रवासाचा मागोवा या चित्रपटात घेण्यात आलेला आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते नागराज मंजुळे यांचा भाऊ भूषण मंजुळे याची प्रमुख कलाकार म्हणून नायकाची प्रतिमा छान झाली आहे.आपल्या भूमिकेला त्यानी न्याय दिला आहे अभिनेता प्रसाद ओक याने पत्रकाराची भूमिका उत्तमच केलेली आहे.ती फार उठून दिसते. नायक परिस्थितीच्या पलीकडे स्वप्न पाहण्याचे धाडस करतो. त्याची धडपड आणि दृढनिश्चय कथानकाला चालना देते, यात धीर आणि प्रेरणेची कथा दिसते. कथानकात खोलवर भर घालते.या चित्रपटात मिलिंद शिंदे,यांनी उत्तम खलनायक वठवला आहे. इतर त्यांच्या चित्रपटअपेक्षा या चित्रपटात कळनायकीची वेगळीच छटा उमटलेली दिसते.मित्र म्हणून कैलास वाघमारे,ठीक वाटला. नायिका उर्मिला जगताप हिचा हा पहिलाच चित्रपट असून सुद्धा तिने पत्नी म्हणून छान भूमिका निभावली आहे. रुचिरा जाधव व इतर सह कलाकार स्वप्नील राजशेखर, शुभांगी लाटकर, विजय पाटकर, अनंत महादेवन, ज्ञानेश वाडेकर, महेश सुभेदार, शिवाजी पाटणे, गणेश रेवडेकर, अभिनव पाटेकर, अनिल कवटेकर,प्रशांत, अर्जुन, अर्जुन, विष्णू आणि विशाल यांनी छोट्या परंतु स्मरणात राहणाऱ्या भूमिका केल्या आहेत. .बालकलाकार अर्जुन गायकर आणि तनुष्का म्हाडसे यांच्याही भूमिका ठीक वाटल्या.दिग्दर्शक सिम्मी आणि रॉबिन या जोडगोळीने चित्त थरारक दृश्याने चित्रपट भरून काढला आहे.त्याला वेगळेच पार्श्व संगीत दिल्याने चित्रपट रोमांचक झाला आहे. पुढे काय होईल याची प्रेशकांना उत्कंठा लागून राहते..ऍक्शन दृश्य तर जबरदस्त झाली आहेत. त्याला साऊथ चा फिल आलेला आहे.
या चित्रपटात पाच गाण्यांचा समावेश आहे, ज्यात चार गाणी विनू थॉमस यांनी संगीतबद्ध केली आहेत. ए.आर. रहमानचे माजी सहाय्यक, संगीत दिग्दर्शक शुभम भट यांनी आदर्श शिंदे यांनी “घव दे जरा रा…” संगीतबद्ध केले आहे. अभिजीत कोसंबी आणि सायली कांबळे यांनी मंदार चोळकर लिखित “गर गार गा…” ला आवाज दिला आहे मंदारने रोहित राऊतने गायलेलं “जागुया मनसोक्त सारे…” देखील लिहिलं आहे. गुरू ठाकूरच्या “का सुनून सुना झाला…” मनीष राजगिरेच्या अभिनयातून भावनिक वजन वाढवते, तर “फुलोरा…” हे मंदारचे आणखी एक काम, मुग्धा कऱ्हाडे यांनी गायले आहे. वैभव देशमुखचे “घाव दे जरा…” या गाण्याचे बोल शुभम भटच्या रचनेत आणखी खोलवर भर घालतात.
परस्थितीच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करनाऱ्या प्रत्येक व्यक्ती ला संघर्षाशी सामना करून मार्ग काढावा लागतो. ही प्रेरणा घेण्यासाठी आपल्याला चित्रपट सह कुटुंब पाहावा लागेल.
By Sunder M
