प्रेमळ नातेसंबंधांची उकल आणि हास्याचा मनमुराद मेळ साधणारे ‘एकदा पाहावं करून’ लवकरच रंगभूमीवर!
प्रेमळ नातेसंबंधांची उकल आणि हास्याचा मनमुराद मेळ साधणारे ‘एकदा पाहावं करून’ लवकरच रंगभूमीवर!
मराठी रंगभूमीवर नातेसंबंधांची कडू-गोड बाजू आणि हलक्याफुलक्या विनोदांचा सुंदर ताळमेळ साधणारे रत्नाकर मतकरी लिखित ‘एकदा पाहावं करून’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
ही कथा अशा दोन पुरुषांची आहे, जे विरुद्ध स्वभावाचे, विचारसरणीचे आहेत आणि ते काही कारणास्तव समोरासमोर येतात. त्यानंतर सुरू होतो गोंधळ, गैरसमज आणि हास्याचा धडाका!
या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे अभिनय क्षेत्रातील अनुभवी तसेच तरुण कलाकारांची मजबूत फळी. भार्गवी चिरमुले, अभिषेक देशमुख, नेहा कुलकर्णी, गौरी महाजन, कृष्णा चतुर्भुज, नामांतर कांबळे, धनश्री दळवी, भूषण पाटील आणि आनंद इंगळे व वैभव मांगले अशा ताकदीच्या कलाकारांनी सजलेले हे नाटक रंगभूमीवर नक्कीच धमाल घडवणार आहे.
नाटकातील गंमतीजंमती, घरगुती प्रसंग आणि प्रत्येक पात्रामागची वेगळी भावनात्मक बाजू प्रेक्षकांना हसवत लोटपोट अनुभव देईल.
रत्नाकर मतकरींच्या लेखनाची सहजसुंदर शैली आणि विजय केंकरे यांच्या दिग्दर्शनाचा अनुभव यामुळे हे नाटक प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहे.
भूमिका, प्रवेश क्रिएशन्स, असंम्य थिएटर्स निर्मित व रत्नाकर मतकरी लिखित ‘एकदा पाहावं करून’ या नाटकाचे दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केले आहे. तसेच निर्माते श्रीकांत तटकरे, मंगल केंकरे व अजय विचारे हे आहेत. हास्याचे वादळ घेऊन येणारे ‘एकदा पाहावं करून’ या नाटकाचा शुभारंभ ६ डिसेंबर रोजी पुण्यातील भरत नाट्य रंगमंदिर येथे होणार आहे.
By Sunder M
