एस.एन.वी. स्टुडिओच्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार प्रसिद्ध अभिनेता शिव ठाकरे, चित्रीकरणाचा फोटो केला शेयर!
बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा विजेता व बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वाचा उपविजेता शिव ठाकरे लवकरचं (SNV Studioo) एस.एन.वी. स्टुडिओच्या नव्या प्रोजेक्टमधून झळकणार आहे. त्याने शूटिंग मधील एक लग्नाचा फोटो शेअर करत त्याच्या फॅन्स सोबत गम्मत केली. त्यानंतर त्याच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. हे पाहून मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीमधील कलाकारांनी त्याला सोशल मीडियावर लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. परंतू त्याने पॅक अप अस कॅप्शन लिहून नुकतच व्हिडिओ पोस्ट केला. २०२६ मधील माझ्या पहिल्याच प्रोजेक्टच शूटिंग पूर्ण झाल आहे. असही त्याने त्यात लिहील आहे. शिवच्या (SNV Studioo) एस.एन.वी. स्टुडिओ सोबतच्या नव्या प्रोजेक्टची उत्सुकता फिल्म इंडस्ट्रीसोबत त्याच्या फॅन्सना ही लागून राहिली आहे. (SNV Studioo) एसएनवी स्टुडिओची निर्मिती वैशाली काळे, नितीन घुगे, सागर सकट यांनी केली आहे. या प्रोजेक्टचे दिग्दर्शन सागर सकट यांनी केले आहे.
अभिनेता शिव त्याच्या नव्या प्रोजेक्टविषयी सांगतो, “वर्षातला हा माझा पहिलाच प्रोजेक्ट आहे. २०२६ मधला हा माझा सगळ्यात जवळचा प्रोजेक्ट आहे. मला (SNV Studioo) एसएनवी स्टुडिओसोबत काम करताना खूप मज्जा आली. या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी वेगळ पाहायला मिळणार आहे. लवकरच हा प्रोजेक्ट तुमच्या भेटीला येणार आहे.”
निर्मात्या वैशाली काळे त्यांच्या नव्या प्रोजेक्टविषयी सांगतात, “आमच्या (SNV Studioo) एस.एन.वी. स्टुडिओच्या नव्या वर्षातील नवीन प्रोजेक्टला नुकतीच सुरुवात अगदी दिमाखात आणि उत्साहात झाली आहे. आम्ही नेहमीच प्रेक्षकांसाठी हृदयाला भिडणाऱ्या कथा घेऊन आणण्याचा प्रयत्न करत असतो. या प्रोजेक्टमध्ये देखील तुम्हाला काहीतरी नव पाहण्याचा अनुभव मिळेल याची आम्हाला खात्री आहे. यावेळी आम्ही पहिल्यांदाच प्रसिद्ध शिव ठाकरे याच्या सोबत काम केल आहे आणि हा अनुभव अतिशय छान होता. शीव ठाकरे हा मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेता असून त्याच्या अभिनयामुळे आणि कामातील उत्साहामुळे आमच्या टीमला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळाली. यामुळे आमच्याकडून एक सुंदर कलाकृती निर्माण होईल असा विश्वास आहे. (SNV Studioo) एस.एन.वी. स्टुडिओच पहिल प्रोजेक्ट हे अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींना समर्पित ‘तुला ना कळे’ गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं. “तुला ना कळे” या गाण्याला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळाला. तसंच या ही प्रोजेक्टची खूप उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. ते पाहून आनंद होत आहे.“
अभिनेता शिव ठाकरे प्रमुख भूमिका असलेला हा प्रोजेक्ट कोणता असेल तसेच त्याच्या सोबत ही कोणती अभिनेत्री आहे याची उत्सुकता सर्व प्रेक्षकांना लागली आहे.
https://www.instagram.com/reel/DTcIPRQjD5i/?igsh=Z2Y1MTZ4bjE1eWR1
By Sunder
